अनिल कपूर हे बॉलीवूडमधील एक एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या व्यायामाच्या सवयीमुळे आताच्या अनेक तरुण अभिनेत्यांना टफ फाईट देताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांचे विविध फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन देत असतात. आता असाच त्यांचा व्हिडीओ पाहून अभिनेते अनुपम खेर आश्चर्यचकित झाले आहेत.

अनिल कपूर गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचं फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. अनिल कपूर सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. तर गेले काही दिवस ते ऑक्सिजन थेरपी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑक्सिजन मास्क तोंडाला लावून ट्रेडमिलवर धावतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तर आता अनुपम खेर यांनी अनिल कपूरचा एक व्हिडीओ शेअर करत हटके प्रतिक्रिया दिली.

gautam gambhir hugs shahrukh khan
Anant Radhika Wedding: गौतम गंभीर-किंग खानचा अंबानींच्या लग्नात ‘ब्रोमान्स’, एकमेकांना पाहताच… VIDEO व्हायरल
sleeping advisor at paris olympics with indian squad
झोपी गेलेला प्रॉडक्टिव्ह झाला!!
Mahindra SUV discounts in June 2024:
टाटा-महिंद्रकडून ‘एसयूव्ही’च्या किमतीत कपात
Lal krishna Advani Death Viral News
Fact check: लालकृष्ण अडवाणींच्या निधनाची पोस्ट व्हायरल; भाजपा नेत्यांनीही आधी वाहिली श्रद्धांजली मग कळलं सत्य
Anant Ambani Radhika Murchant Varun Grovar
“राजेशाही अराजकता निर्माण करते”, अनंत अंबानींच्या लग्नावरून लेखक वरूण ग्रोव्हर यांची जळजळीत टीका
What Shabana Azmi Honey Irani?
शबाना आझमी यांचं जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबाबत वक्तव्य, “तिने मुलांच्या मनात विष…”
Joe Biden Donald Trump United States presidential election democratic contenders replace biden
बोलताना अडखळतात, चालताना धडपडतात! बायडन यांची उमेदवारी गेली तर या सहांपैकी कुणालाही मिळू शकते संधी!
legendary bharatanatyam dancer c v chandrasekhar
व्यक्तिवेध : सी. व्ही. चंद्रशेखर

आणखी वाचा : Video: उणे ११०° तापमान, अंगावर शर्टही नाही…; अनिल कपूर यांचा वर्कआउट व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क, म्हणाले…

अनुपम खेर यांनी ट्विटरवर अनिल यांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत अनिल कपूर एका चेंबरमध्ये आडवे होत ऑक्सिजन थेरेपी घेताना दिसत आहेत. अनिल यांनी मास्क लावला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम यांनी लिहिलं, “अरे कपूर साब! तुम्ही सांगितलं नाही की चंद्रावर जात आहात ते? अर्थात या मशीनचा तुमच्या तरुण्याच्या राहास्याशी काही संबंध असेल तर?” त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या सर्व चाहत्यांनाही आवडला आणि त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत अनिल कपूर भावूक, म्हणाले, “माझा मित्र…”

अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर अनिल कपूरने देखील ती पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, “जादूगार कधीही त्यांची गुपित उघड करत नाहीत…” आता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.