Anupam Kher Get’s Emotional After India Won The Asia Cup 2025 : भारताने आशिया चषकात विजेतेपद मिळवल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. सर्व भारतीय सध्या जल्लोष साजरा करत आहेत आणि टीम इंडियाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. अशातच आता अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला. महत्त्वाचं म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता हा विजय मिळवला आहे, त्यामुळे सध्या सर्वत्र टीम इंडियाचं कौतुक होतं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा आनंद व्यक्त केला आहे. अशातच आता अनुपम खेर यांनीदेखील भारत-पाकिस्तान मॅच संदर्भात व्हिडीओ शेअर करत व्यक्त झाले आहेत.
अनुपम खेर यांची भावुक प्रतिक्रिया
खेर यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओला त्यांनी “भारत माता की जय” अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये ते भावुक होत “भारत माता की जय, खूप छान, कमाल मॅच, जिंकणार म्हणजे जिंकणार खूप आनंदी आहे मी; काय बोलू कळत नाहीये. मला माझ्या देशाचा अभिमान आहे, आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. खूप उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली आहे. वंदे मातरम् भारत माता की जय” असं म्हटलं आहे.
भारताचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यादरम्यान अनुपम यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आल्याचं पाहायला मिळतं. अभिनेते यावेळी भावुक झाले असून त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करत त्यांच्या या सामन्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारत माता की जय! ❤️??????????❤️❤️❤️ #AsiaCupFinal #TeamIndia #Cricket pic.twitter.com/yXCUUqkWhl
— Anupam Kher (@AnupamPKher) September 28, 2025
भारताने पाकिस्तानला धूळ चारत विजय मिळवल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. खरंतर एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबर कुठलेही सामने खेळू नये असं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, आता भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व भारतीय आनंद साजरा करत आहेत.