scorecardresearch

अनुपम खेर यांनी केलेला श्रीदेवीच्या बहिणीचा लूक; व्हायरल फोटो शेअर करत अभिनेता जुन्या आठवणींमध्ये रममाण

अनुपम खेर यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीच्या लूकमध्ये एक खास फोटो शेअर केला आहे

anupam kher as sridevi sister
फोटो : सोशल मीडिया

अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगले चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहत विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते बेधडकपणे आपली मत मांडताना दिसतात. ते नेहमीच त्यांच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने व्यक्त होतात. गेल्या अनेक वर्षात अनेक सुपरहिट चित्रपट देऊन त्यांनी प्रेक्षकांच्या मनातील त्यांचं स्थान अधिक बळकट केलं आहे.

याबरोबरच अनुपम खेर हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांची मतं आणि काही धमाल किस्से ते त्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतात. असाच एक किस्सा आणि फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी लोकांना चकित केलं आहे. अनुपम खेर यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीच्या लूकमध्ये एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून कित्येकांना धक्काच बसला आहे.

आणखी वाचा : खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

‘सिनेब्लीटझ्’ या मासिकासाठी १९९१ साली १ एप्रिल रोजी एप्रिल फूलसाठी हा खास लूक करून अनुपम खेर यांचा हा फोटो शेअर करण्यात आला होता. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी अनुपम खेर यांचे हे फोटो काढले होते. हा फोटो पुन्हा एप्रिल फूलच्या मुहूर्तावर अनुपम खेर यांनी शेअर केला आहे. “ते चित्रपटातील फार निरागस दिवस होते” असं लिहीत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

हा फोटो जेव्हा मासिकावर आला तेव्हा बऱ्याच लोकांना धक्काच बसला. काहींनी अनुपम खेर यांची तुलना रेखाशी केली तर काहींनी चटकन अनुपम खेर यांना ओळखलं होतं. नुकतंच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटातून अनुपम खेर आपल्यासमोर आले. त्यानंतर त्यांचा ‘उंचाई’ हा चित्रपटही सुपरहीट ठरला. सध्या ते विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:30 IST

संबंधित बातम्या