बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक ९ मार्चला निधन झालं. होळी पार्टीसाठी दिल्लीला गेलेल्या कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

सतीश कौशिक होळी पार्टीसाठी ज्या व्यावसायिकाच्या हार्म हाऊसवर गेले होते, तिथून काही औषधेही जप्त करण्यात आली होती. कौशिक यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप व्यावसायिक विकास मालू यांच्या पत्नीने केले होते. त्यांनी नवऱ्यावरच कौशिक यांच्या हत्या हत्येचा आरोप केला होता. याबाबत मालू यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्याबरोबरच कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांनीही या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं. आता कौशिक यांचे जवळचे मित्र व बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरुन अनुपम खेर यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> लेकाला धमकीचा मेल आल्यानंतर सलीम खान चिंतेत, सलमान खानच्या मित्राचा खुलासा, म्हणाला “ते रात्रभर…”

सतिश कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचं आयोजित करण्यात आली होती. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या प्रार्थना सभेला हजेरी लावली होती. यावेळी अनुपम खेर यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “गेले काही दिवस मी सतीशचा हसत नसलेला किंवा दु:खी असलेला फोटो शोधण्याचा प्रयत्न केला. पण, असा फोटो मला मिळालाच नाही. तो आयुष्यभर प्रतिष्ठितपणे जगला. तो गेल्यानंतरही त्याची प्रतिष्ठा कायम राखली गेली पाहिजे. त्याच्या मृत्यूबद्दलच्या अफवा बंद झाल्या पाहिजेत”.

हेही वाचा>> “फाफडा लाटण्याने कोण लाटतं?” अरुणाच्या डिशमुळे ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ ट्रोल, नेटकरी म्हणाले “रणवीर ब्रार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश कौशिक व अनुपम खेर खूप चांगले मित्र होते. कौशिक गेल्यानंतर अनुपम खेर यांना अतिव दु:ख झालं आहे. कौशिक यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस अनुपम खेर यांना अश्रू अनावर झाले होते.