बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री कंगना रणौतबद्दल अनुराग कश्यपने विधान केलं आहे. ती अभिनेत्री म्हणून उत्तम आहे, पण तिच्या इतर समस्याही आहेत, असं त्याने म्हटलं आहे. नुकतीच अनुराग कश्यप व अभिनेता झीशान अय्युबने एकत्र एक मुलाखत दिली. या मुलाखतीत झीशानने कंगनाबद्दल एक वक्तव्य केलं, तेव्हा त्याला मधेच अडवत अनुरागने कंगनाबाबत त्याचं मत मांडलं.

दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष

मुलाखतीदरम्यान झीशान म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा कंगना एक अभिनेत्री म्हणून उत्कृष्ट होती.” तो असं म्हणताच अनुरागने त्याला अडवलं आणि म्हणाला, “ती उत्तम अभिनेत्री आहे. कामाच्या बाबतीत ती खूप प्रामाणिक आहे, पण तिच्या इतर समस्या आहेत. मात्र जेव्हा तिच्या प्रतिभेचा विचार केला जातो तेव्हा कोणीही तिच्यापासून ते हिरावून घेऊ शकत नाही.”

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुराग कश्यप आणि कंगना रणौत यांनी २०१३ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ या हिट चित्रपटात एकत्र काम केले होते. याचे दिग्दर्शन फँटम फिल्म्सने केले होते, ज्याचा सह-मालक अनुराग कश्यप आहे. ‘जिस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत, अनुराग कश्यपबरोबर झीशान अय्युब सहभागी झाला होता. त्याने कंगना रणौतबरोबर ‘तनु वेड्स मनू’ (२०११), ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ (२०१५) आणि ‘मणिकर्णिका’ (२०१९) मध्ये काम केले होते.