दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या त्याच्या चित्रपटातून विविध प्रयोग करत आला आहे. त्याचे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारखे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अनुराग कश्यपने अशा चित्रपट तयार करताना त्यात अनेक प्रयोग केले. पण अनुरागने तयार केलेल्या अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. ‘केनेडी’ चित्रपटाचा २०२३ च्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर झाला होता. तरीही तो अद्यापही प्रदर्शित झालेला नाही. त्याच्या पाच चित्रपटांवर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे.

एका मुलाखतीत, अनुरागने मुंबई सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती कारण तो म्हणाला की त्याला आजूबाजूला जे काही दिसत आहे त्यावर ‘घृणा’ वाटते. तसेच, तो म्हणाला की आजच्या फक्त नफा कमावण्यावर आधारित वातावरणात, त्याला पूर्वीच्या त्याच्या गाजलेल्या चित्रपटांसारखे प्रकल्प तयार करणे अशक्य वाटते. “आजच्या काळात सिनेमाच्या सर्जनशीलतेला नाही तर तो चित्रपट किती नफा कमावेल याला महत्त्व दिलं जातं” असे अनुराग म्हणाला.

हेही वाचा…“’मैने प्यार किया’साठी माझी निवड झाली होती पण…”, कॉमेडी नाइट्स विथ कपिल फेम अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, “मी सलमान खानपेक्षा…”

‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला, “मी पाच चित्रपट तयार केले आहेत जे अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. ‘केनेडी’ कुठे आहे? आणि ‘केनेडी’ कोणाच्या हाती आहे? तो अशा लोकांच्या हाती आहे ज्यांनी कधीही चित्रपट तयार केले नाहीत. ज्यांनी ‘केनेडी’ स्टुडिओत तयार केला ते सगळे लोक आता तिथं नाहीत. आणि सध्या तिथं असलेल्या लोकांना फक्त एकच आदेश आहे, शेअरचे भाव वाढवा, नफा कमवा, खर्च भरून काढा… एवढंच त्यांना कळतं. त्यांना चित्रपटांमध्ये अजिबात रस नाही. केनेडी कान्समध्ये गेला किंवा महोत्सवांमध्ये त्याला मोठ्या प्रमाणावर कौतुक मिळालं, याचं त्यांना काहीही महत्त्व नाही. भारताबाहेर सोडा, इथल्या प्रतिसादाचंही त्यांना काही सोयरसुतक नाही.”

अनुराग कश्यप म्हणाला की, चित्रपटसृष्टीत( बॉलीवूडमध्ये) सध्या कोणतीही जोखीम घेतली जात नाही. “त्यांना काहीच कळत नाही. ते ‘पुष्पा’सुद्धा तयार करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे चित्रपट बनवण्याचं ज्ञान नाही. त्यांना कळत नाही की चित्रपटनिर्मिती म्हणजे काय. फक्त सुकुमारच ‘पुष्पा’ बनवू शकतो. दक्षिणेत लोक चित्रपट निर्मात्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांना स्वतंत्रपणे चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात. इथे मात्र सगळे एका काल्पनिक विश्वाची निर्मिती करायचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतःच्या विश्वाचंही काही कळत नाही, तरी ते स्वतःला देव समजतात.”

हेही वाचा…“सहा वर्षांत अनेक वेळा स्वतःला संपवण्याचा…”, MeToo प्रकरणात आरोप झालेल्या बॉलीवूड दिग्दर्शकाने केला खुलासा; म्हणाला…

अनुराग म्हणाला की त्याने त्याच्या प्रदर्शित न झालेल्या प्रकल्पांपासून (चित्रपटांपासून) स्वतःला वेगळं करण्याचं तंत्र शिकले आहे: “मी केनेडीपासून स्वतःला वेगळं केलं आहे कारण मला माझी ‘ब्लॅक फ्रायडे’ च्या (सिनेमाच्या) वेळी जी परिस्थिती झाली होती ती होऊ द्यायची नाही.

अनुराग पुढे म्हणाला, “ मला काही लोकांचा प्रचंड तिरस्कार करतो , पण मी त्यांच्याबाबतीत काही बोलणार नाही. मी माझ्या लढाया लढल्या आहेत, तुम्ही भिंतीशी लढू शकत नाही. माझ्यात ती ऊर्जा राहिलेली नाही…”

हेही वाचा…Video: लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, अनुराग कश्यपची ‘मॅक्सिमम सिटी’ या वेब सीरिजला नेटफ्लिक्सने शेवटच्या क्षणी नकार देत ती सीरिज रद्द केली होती. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, या निर्णयाचा त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आणि तो नैराश्यात गेला. याच काळात त्याला दोन हृदयविकाराचे झटके आले आणि अनुराग मोठ्या प्रमाणावर दारूचे सेवन करू लागला. त्याने सांगितले, “मॅक्सिमम सिटीसाठी मी खूप मेहनत घेतली होती. हा प्रकल्प रद्द झाल्याने मला खूप दुःख झालं होतं .” असे त्याने नमूद केले.