बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. ‘ए दिल है मुश्किल’, ‘संजू’ सारख्या चित्रपटांमधील या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. ऑनस्क्रीन प्रमाणेच ऑफस्क्रीनही दोघ चांगले मित्र आहेत. मात्र, रणबीरच्या त्या वागणूकीला कंटाळून अनुष्काला त्याला चापट मारण्याची इच्छा झाली होती. खुद्द अनुष्काने एका मुलाखतीत याबाबचा खुलासा केला होता.

हेही वाचा- …जेव्हा अचानक जोरजोरात ओरडू लागले होते अमिताभ बच्चन; सेटवर सगळ्यांना बसला होता धक्का

‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात अनुष्काने रणबीरला थप्पड मारली होती. त्यानंतर एका मुलाखतीत अनुष्काला विचारण्यात आले होते की, तुला कधी रणबीरला खऱ्या आयुष्यात थप्पड मारण्याची इच्छा झाली होती का? या प्रश्नावर उत्तर देत अनुष्का म्हणालेली “मला रणबीरला थप्पड मारायची होती. ऑनस्क्रीन मला चापट मारण्यासाठी बळजबरी करण्यात आली होती. मात्र, ऑफस्क्रीन माझ्यावर कुणीही बळजबरी करु शकत नाही. कारण रणबीर मला खूप त्रास देतो. तो माझ्या हातावर शिंकतो. त्याचे घाणेरडे हात माझ्या कपड्यांना पूसतो.”

हेही वाचा- पहिल्या डेटवर कधी सेक्स केला आहे का? तमन्ना भाटिया व विजय वर्मा म्हणाले…

चित्रपट ‘बॉम्बे वेलवेट’च्या चित्रीकरणादरम्यान रणबीरने अनुष्काला एवढा त्रास दिला होता, की ती ढसाढसा रडू लागली होती. नुकतंच ‘कॉफी विथ करण’मधील अनुष्काचे एक जुने विधान चर्चेत आले आहे. यामध्ये ती करणच्या विरोधात करणवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करायचा असल्याचं म्हणाताना दिसत आहे. अनुष्काने नॅशनल टीव्हीवर सांगितले होते की करण तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. तसेच जॅकलीनलाही हा अनुभव आला असल्याचे तिने सांगितले होते.

हेही वाचा- “तिचं नाक…”; नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठिंबा दिल्यावरुन कंगना राणौतवर आलिया भडकली, म्हणाली…

रणबीरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच रणबीरचा ‘तू झुठीं में मक्कार’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात श्रद्धा कपूर रणबीरसह प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच रणबीरचा अॅनिमल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.