बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली या दोघांची जोडी कायमच चर्चेत असते. मध्यंतरी अभिनेत्री दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, यावर विराट किंवा अनुष्काने कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. अभिनेत्री दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सध्या सोशल मीडियावर बंगळुरूच्या हॉटेलमधील दोघांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा : आशुतोष राणाने रेणुका शहाणेला कोणती कविता लिहून केलं होतं प्रपोज? वाचा माहीत नसलेला किस्सा

इन्स्टाग्रामवरील पापाराझी पेजेसवर अनुष्का शर्मा व विराट कोहलीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने बायकोचा हात पकडला असून अनुष्का बेबी बंपसह चालताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दोघांच्याही चाहत्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे.

अनुष्का शर्माने या व्हायरल व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा शिफली ड्रेस परिधान केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये, “…म्हणून वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी अनुष्का येत नाहीये”, “अनुष्का शंभर टक्के गरोदर आहे”, “दोघेही एकत्र छान दिसतात”, “अनुष्का-विराट तुम्हाला दुसऱ्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा” अशा असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “माझं माहेर आणि सासर दोन्ही…”, शिवानी रांगोळे ‘अशी’ साजरी करणार आहे यंदाची दिवाळी; म्हणाली, “मी आणि विराजस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केलं होतं. यानंतर अभिनेत्रीने २०२१ मध्ये वामिकाला जन्म दिला. दोघांनीही आजवर वामिकाचा चेहरा मीडियासमोर दाखवलेला नाही. या जोडप्याने मुलीचा जन्म झाल्यावर तिचे फोटो काढू नका अशी विनंती पापाराझींना केली होती. दरम्यान, विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याने सध्या विरुष्काच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.