अरबाज खान आणि शुरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी मित्रपरिवारासमवेत लग्नगाठ बांधली. अरबाजच्या चाहत्यांना याचा सुखद धक्का बसला, कारण तोपर्यंत या कपलने त्यांच्या नात्याचा कुठेही खुलासा केला नव्हता. अरबाजने सांगितलं की, लग्नाआधी शुरा आणि तो एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने त्याची आणि शुराची पहिली भेट कशी झाली, याबद्दल खुलासा केला आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला की, त्याने निर्मित केलेल्या 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर तो पहिल्यांदा शुराला भेटला. या चित्रपटात रवीना टंडन प्रमुख भूमिकेत होती आणि शुरा रवीनाची मेकअप आर्टिस्ट होती. अरबाजने सांगितलं की, शुरा रवीनाबरोबर सात ते आठ वर्षांपासून काम करत होती. 'पटना शुक्ला'च्याआधी अरबाज कधीच शुराला भेटला नव्हता किंवा तिच्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. अरबाज पुढे म्हणाला की, त्यांची लव्ह स्टोरी सेटवर भेटल्यानंतरसुद्धा खूप वेळानंतर सुरू झाली. सेटवरचा त्यांचा संवाद खूप मर्यादित होता. "रवीनाची केसं नीट कर" किंवा "हॅलो", "हाय" वगैरे असे संवाद दोघांमध्ये व्हायचे. शूट संपल्यानंतर दोघं काही मीटिंग्समध्ये आणि पार्टीजमध्ये भेटले होते. त्यानंतर त्यांची ओळख वाढली. लोकांना कळण्याआधीच ते एक वर्ष एकमेकांना डेट करत होते. हेही वाचा. “मोदीजी माझ्या भावाचं निधन…”, सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने पंतप्रधान मोदींना केली विनंती, म्हणाली… अरबाज असंही म्हणाला की, "आम्ही स्वत:ला खूप नशीबवान समजतो, कारण आम्ही एकमेकांना कॉफी शॉप्समध्ये भेटत होतो. मी तिला घरी सोडायलापण जायचो, तरीही आम्हाला मीडिया, पापाराझी किंवा कोणीही स्पॉट केलं नाही." हेही वाचा. “अनेकदा मला गुदमरल्यासारखं…”, कतरिना कैफला बॉलीवूडमध्ये काम करताना आला होता ‘असा’ अनुभव, म्हणाली… दरम्यान, अरबाजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर १९ वर्षांच्या संसारानंतर २०१७ रोजी अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाज अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. अरबाजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शुराला भेटण्याआधी दोन वर्षांपूर्वी जॉर्जिया एंड्रियानी आणि त्याचं ब्रेकअप झालं होतं.