प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानने गेल्या वर्षा अखेरीस आयुष्याची नवी सुरुवात केली. गर्लफ्रेंड शुरा खानबरोबर अरबाज दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. तेव्हापासून दोघांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच शुराचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होतं, जे आता रिकव्हर झालं आहे. याची माहिती तिने स्वतः इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे.

इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होण्यापूर्वी शुरा खानने पती अरबाज खानबरोबर रोमँटिक फोटो पोस्ट केले होते. शुरा व अरबाजच्या या रोमँटिक फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

हेही वाचा – ‘बिग बॉस १७’ विजेता मुनव्वर फारुकी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर करतोय काम, फोटो झाले व्हायरल

आता शुराने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे, “सगळ्यांना नमस्कार, गेल्या आठवड्यात माझं इन्स्टाग्राम अकाउंटशी छेडछाड केली होती. ज्यामुळे माझं अकाउंट हॅक झालं होतं. माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत वाईट होता. परंतु इन्स्टाग्राम, फेसबुक आणि माझा मित्र शैली भूत्रा यांच्या मदतीने माझं अकाउंट मला परत मिळवता आलं. मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. पुन्हा इन्स्टाग्रामवर सक्रिय झाल्याने चांगलं वाटतंय. खूप सारं प्रेम, तुमची शुरा खान.”

हेही वाचा – लग्नाच्या चर्चांदरम्यान ‘बिग बॉस’मधील ‘या’ लोकप्रिय जोडीचे ब्रेकअप, अभिनेत्री म्हणाली, “५ महिन्यांपूर्वीच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरबाज खानचं पहिलं लग्न मलायका अरोराबरोबर १९९८ साली झालं होतं. १९ वर्षांचा संसार केल्यानंतर अरबाज आणि मलायका विभिक्त झाले. यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला बराच काळ डेट करत होता. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण काही काळानंतर अरबाज शुराला डेट करू लागला. दोघांची मैत्री एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघं लग्नबंधनात अडकले.