Archana Puran Singh on his son: अर्चना पुरण सिंह व परमित सेठी हे त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. यूट्यूब ब्लॉगद्वारे ते त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी प्रेक्षकांशी शेअर करतात.
अभिनेत्री अनेकदा त्यांच्या मुलांविषयीदेखील अनेक खुलासे करताना दिसतात. तसेच त्यांच्या कुटुंबाला विविध पदार्थ खायलादेखील आवडतात. नुकत्याच समोर आलेल्या ब्लॉगमध्ये हे कुटुंब सिंधी पदार्थ खाण्यासाठी गेले असल्याचे पाहायला मिळाले.
अर्चना पुरण सिंगच्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी काय केले?
यादरम्यान, अर्चना व परमित यांचा मुलगा आर्यमनने त्याच्या गर्लफ्रेंडसाठीदेखील काही पदार्थ पॅक करून घेतले. हे जेव्हा अर्चना सिंगने ते पाहिले तेव्हा त्या ब्लॉगमध्ये असे म्हणाल्या की, तो त्याची गृहस्थी वाचवण्यासाठी या गोष्टी करत आहे. त्या म्हणाल्या, “हा बिचारा त्याची गृहस्थी वाचवण्यासाठी जिथे जाईल तिथून सगळे पदार्थ पॅक करून घेत आहे.”
या कुटुंबाने विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील चेंबूर परिसरातील दाल पाव, पाणी पुरी, दाल पकवान असे काही विविध पदार्थ त्यांनी खाल्ले.
अर्चना पुरण सिंगचा मुलगा आर्यमनदेखील त्यांच्याबरोबर दिसला. काही दिवसांपूर्वीच अर्चना पुरण सिंह यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये आर्यमनची गर्लफ्रेंड अभिनेत्री योगिता बिहानीची चाहत्यांना ओळख करून दिली. योगिता बिहानी अनेकदा अर्चना यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत असल्याचे दिसते.
अभिनेत्रीच्या यूट्यूब ब्लॉगचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या व्हिडीओंना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. तसेच, कमेंट करत चाहते त्यांच्या कुटुंबाचे कौतुक करताना दिसतात.
अर्चना पुरण सिंग सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या नेटफ्लिक्सवरील कार्यक्रमात दिसतात. अनेक कलाकार, क्रिकेटरदेखील पाहुणे म्हणून या कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात.
प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमाची ओळख आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार, नामवंत व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात.