आपल्या हास्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरन सिंह. अर्चनाने यापूर्वी अनेक बॉलीवूड चित्रपटांमधून काम केलं आहे. याशिवाय ती गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्माच्या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतही दिसते. मनोरंजन क्षेत्रामध्ये सक्रीय असणारी अर्चना युट्यूबवरही सक्रीय असते. युट्यूबवर ती तिचे अनेक व्लॉग व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अर्चनाने कुटुंबाबरोबरच्या स्वित्झर्लंड ट्रीपची झलक व्लॉगच्या माध्यमातून शेअर केली आहे.

या व्लॉग व्हिडीओमधून त्यांनी पालक म्हणून त्यांच्या मुलांसाठी एक नियम केल्याचंही समोर आलं आहे. अर्चना व परमीत यांनी पालक म्हणून एक नियम बनवला आहे, तो नियम म्हणजे त्यांची मुले विमान प्रवासाचं तिकीट स्वतः खरेदी करू शकत नाहीत, तोपर्यंत ते बिझनेस क्लासमधून प्रवास करणार नाहीत. स्वित्झर्लंडच्या या ट्रिपमध्ये त्यांच्या मुलांनी पहिल्यांदाच विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास केला.

या व्हिडीओमध्ये, आयुष्मानने खुलासा केला की ही त्याची आणि आर्यमनची बिझनेस क्लासमधील प्रवासाची पहिलीच ट्रिप होती. यात तो म्हणतो, “मित्रांनो, मी आणि आर्यमन पहिल्यांदाच बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत आहोत. आमच्या पालकांनी आमच्यासाठी एक नियम केला होता की, ते आम्हाला कधीही बिझनेस क्लासचे तिकीट देणार नाहीत. आम्हाला ते कमवावं लागेल.” यावर अर्चनाने मध्येच म्हणते, “आणि आता, तुम्ही ते कमावले आहे”.

यानंतर स्वत:च्या लेकांनी त्यांच्या स्वकमाईने विमानाची बिजनेस क्लासची तिकीटं खरेदी केल्याबद्दल अर्चना पूरन सिंह आणि तिचा पती परमीत सेठीने लेकांचं कौतुक केलं आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आयुष्मान आणि आयुर्मान यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. पण त्यांना अद्याप त्यांच्या मनासारखं काम मिळालं नसल्याची खंत त्यांनी मागे मुलाखतीत व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अर्चनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता आदित्य पांचोलीबरोबर तिने करिअरची सुरुवात केली होती. यानंतर नसीरूद्दीन शहा यांच्याबरोबर ‘जलवा’ चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर अर्चनाने ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘शोला और शबनम’, ‘आशिक आवारा’, ‘राजा हिंदुस्तानी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.