scorecardresearch

Premium

तब्बल ९ वर्षांनी अरिजित सिंह व सलमान खानमध्ये पॅच-अप? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

२०१४ च्या एका पुरस्कार सोहळ्यात जेव्हा अरिजितला पुरस्कार घोषित झाला तेव्हा तो घेण्यासाठी अत्यंत साध्या कपड्यात व पायात नेहमीच्या चपला घालून गेला

salmankhan-arijisingh
फोटो : सोशल मीडिया

२०१४ मध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान व सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह मध्ये काही कारणास्तव वाद झाला. यानंतर याचा अरिजितला चांगलाच फटका बसला, इंडस्ट्रीमध्ये यानंतर अरिजितला काम मिळणं बंद झाल्याची चर्चा होती. अर्थात यावर दोघांनी कधीच उघडपणे भाष्य केलं नाही.

आता तब्बल ९ वर्षांनी या दोघांमध्ये पॅच अप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. काल रात्री अरिजितला सलमानच्या घरातून कारमधून बाहेर पडताना पाहिलं गेलं तेव्हापासून या चर्चा होऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या आगामी चित्रपटात सलमान अरिजितला गाणं गाण्यासाठी घेणार असल्याची चर्चा आहे.

Pune Nikhil wagle attack
VIDEO : “हल्लेखोरांनी दगड-काठ्यांनी मारलं, महिलांना लाथा…”, रोहित पवारांनी सांगितलं पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमावेळी काय घडलं
Fraud of 90 lakh by giving lure of good returns on investment
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
Why Dr Raghunath Mashelkar is also attracted to Godavari Gaurav award
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनाही ‘गोदावरी गौरव’चे आकर्षण का?
Parbati Barmauh
देशातील पहिल्या महिला हत्ती माहूत आणि पद्मश्री विजेत्या पार्वती बरुआ कोण आहेत? जाणून घ्या देशाच्या ‘हस्ती कन्ये’ची कहाणी…

आणखी वाचा : “मी घरात नग्नावस्थेत वावरते कारण…” मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेदचा मोठा खुलासा

२०१४ च्या एका पुरस्कार सोहळ्यात जेव्हा अरिजितला पुरस्कार घोषित झाला तेव्हा तो घेण्यासाठी अत्यंत साध्या कपड्यात व पायात नेहमीच्या चपला घालून गेला. त्याला पाहून पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणाऱ्या सलमानने अरिजितला विचारलं, “झोपला होतास का?” त्यावर अरिजित म्हणाला की “तुमच्यामुळेच झोप लागली.” यानंतर सलमानने अरिजितच्या ‘तुम ही हो’ गाण्याचा संदर्भ देऊन एक विनोद केला अन् यानंतरच या दोघांच्या नात्यात कटुता आली.

असं म्हंटलं जातं की यानंतर सलमानने आपल्या ‘बजरंगी भाईजान’, ‘किक’, ‘सुलतान’ या चित्रपटातून अरिजितला बाहेर काढलं. अरिजितने यानंतर सलमानची माफीदेखील मागितली तसंच ‘सुलतान’मधून बाहेर न काढण्याचीही विनंती केली, परंतु तसं झालं नाही. आता ९ वर्षांनी अरिजितला भाईजानच्या घरातून बाहेर पडताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी या दोघांमध्ये पॅच अप झाल्याचं कॉमेंटमध्ये लिहिलं तर काहींच्या मते अरिजित सलमानची माफी मागण्यासाठी घरी आल्याचा कयास लावला. अद्याप अरिजित किंवा सलमान दोघांनीही याबद्दल भाष्य केलेलं नाही, परंतु सोशल मिडीयावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ बरंच काही सांगून जाणारा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arijit singh visits salman khans mumbai residence fans says finally patch up happened avn

First published on: 05-10-2023 at 14:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×