अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील यांची मुख्य भूमिका असलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेचे १००० हून अधिक भाग प्रदर्शित झाले. विवाहबाह्य संबंध, त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी याबद्दल काल्पनिक आणि हलक्या फुलक्या पद्धतीने या मालिकेत भाष्य केलं गेलं. आता याच नावाने बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवला जाणार आहे.

या मालिकेची लोकप्रियता इतकी आहे की, या मालिकेच्या नावासारखं नाव आता एक हिंदी चित्रपटाला देण्यात आलं आहे. या चित्रपटाचे नाव असेल ‘मेरे हसबंड की बीवी.’ हा एक विनोदी चित्रपट असेल. अर्थातच, या चित्रपटाची कथा ही मालिकेपेक्षा थोडी वेगळी आहे. पण या चित्रपटातही गुरूनाथ सुभेदारसारखाच बायको आणि गर्लफ्रेंड यांच्यामध्ये पिचला गेलेला एक हिरो असणार आहे.

आणखी वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज

गेली अनेक दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. परंतु अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित झाले नव्हते ते आता जाहीर करण्यात झाले आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात अजून कपूर, रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे.

हेही वाचा : काही महिने ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आता लंडनला रवाना, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगचे शेवटचे शेड्युलही दोन तीन आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे. मुदस्सर अझीझ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून विष्णू आणि जॅकी भगनानी हा चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २०२३ च्या मध्यात रिलीज होईल असे बोलले जात आहे.