क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. दोघांचे लग्न केवळ क्रिकेट विश्वातीलच नव्हे तर बॉलिवूडमधील लोकप्रिय लग्नांपैकी एक ठरले आहे. दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात आणि एकेमकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात. सध्या हे दोघे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत.

अथिया नेहमीच पती केएल राहुलला सपोर्ट करताना दिसते, मग क्रिकेटचे मैदान असो की दोघांचे वैयक्तिक आयुष्य. दरम्यान, आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पती केएल राहुलबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अलीकडेच अथिया आणि ही तिचा पती केएल राहुलबरोबर लंडनमधील स्ट्रिप क्लबमध्ये दिसल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागली.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसचा ‘दबंग’ झळकणार ओटीटीवर; सैफ व शाहिद पाठोपाठ सलमान खान करणार ओटीटी पदार्पण?

नुकतंच अथियाने याबाबत भाष्य केलं आहे, ज्यामध्ये तिने ही बातमी फेटाळून लावली आहे आणि हे सगळे बिनबुडाचे आरोप असल्याचंही तिने म्हटले आहे. याबद्दल त्यांनी एक निवेदनही जारी केले आहे. अथियाने इंस्टाग्राम स्टोरीवर स्पष्टीकरण दिले आणि लिहिले, “मी सहसा गप्प राहणे पसंत करते आणि प्रतिक्रिया देत नाही, परंतु कधीकधी स्वतःसाठी व्यक्त होणे गरजेचे असते. राहुल, मी आणि आमचे मित्र नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो, जिथे इतर लोकही पार्टी करतात. संदर्भहिन गोष्टी व्हायरल करने थांबवा आणि पहिले त्याची शहानिशा करून घ्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अथिया पोस्ट
अथिया पोस्ट

सध्या अथिया आणि केएल राहुल लंडनमध्ये सुट्टी एंजॉय करत आहेत. अथिया लंडनमधील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना सतत अपडेट्स देत असते. केएल राहुलवर काही काळापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे तो आयपीएलचा सहभागी शकला नाही. मात्र नंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रिकव्हरी अपडेट त्याच्या चाहत्यांशी शेअर केला.