रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन-शिवा’ या चित्रपटाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याने दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अयानने ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाची घोषणा करत चित्रपटाचं काम सुरू झाल्याचं सांगितलं. याचबरोबर पुढील भागातील कथेची खास झलक अयानने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : “‘जय मल्हार’, ‘विठू माऊली’…”, कोठारे व्हिजन्स का देतंय धार्मिक मालिकांवर भर? आदिनाथ कोठारेने सांगितलं कारण…

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासंदर्भातील हटके कलाकृती शेअर करत अयान लिहितो, गेल्या काही महिन्यांपासून आमचं ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागावर काम सुरु आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाचे नाव ‘शिवा’ असे होते, तर दुसऱ्या भागाचे नाव ‘देव’ असे असणार आहे.

हेही वाचा : “माझे चित्रपट पॉर्नसारखे पाहिले जायचे”, अनुराग कश्यपचे विधान; म्हणाला, “माझ्या नैतिकतेवर…”

‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाच्या वर्षपूर्तीनिमित्त अयान मुखर्जीने दुसऱ्या आणि तिसऱ्या भागातील काही कलाकृतींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याला दिग्दर्शकाने “प्रेम आणि प्रकाश यांच्यातील ही शक्ती कायम चमकत राहील” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Video : “असं स्वागत व्हायला भाग्य लागतं!”, विमानतळावर स्वप्नील जोशीला मुलांनी दिलं गोड सरप्राईज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २६९.४ कोटी रुपये आणि जगभरात ४३१ कोटी रुपयांची कमाई केली होती. अयान ‘ब्रह्मास्त्र २ ‘ आणि ‘ब्रह्मास्त्र ३’ एकत्र बनवणार आहे. हे दोन्ही चित्रपट एका वर्षाच्या अंतराने प्रदर्शित केले जाणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र भाग २’ डिसेंबर २०२६ मध्ये रिलीज होईल, तर या चित्रपटाचा तिसरा भाग डिसेंबर २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.