आयुष्मान खुराना( हा त्याच्या अभिनयासाठी, हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. अभिनयाबरोबरच त्याला त्याच्या गाण्यांसाठीदेखील मोठी लोकप्रियता मिळताना दिसते. आता मात्र त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केल्याने तो चर्चेत आला आहे.

काय म्हणाला आयुष्मान खुराना?

आयुष्मान खुरानाने हॉनेस्टली सेइंग पॉडकास्ट (Honestly Saying Podcast) दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी खूप लहानपणी काम करायला सुरुवात केली. १७-१८ वर्षांचा असताना मी पॉप स्टार होतो. २०-२१ व्या वर्षी मी ‘रोडिज’ या शोमध्ये सहभागी झालो होतो. माझा पहिला चित्रपट हिट ठरल्यानंतर मी कसेही वागत होतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा लोकप्रिय होतो, त्यावेळी वाटते की, तुमच्या करिअरसाठी १०० टक्के दिले पाहिजेत. पण, करिअर आणि नातेसंबंध, कुटुंब यांच्यातील समतोल साधता आला पाहिजे; हे मला फार लवकर समजले.”

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

“मला वाटतं महत्त्वाकांक्षा आणि समाधानी यामधील मध्यममार्ग तुम्हाला शोधता आला पाहिजे. असमतोल, अपयश, टीका यामधून जाणे अवघड आहे. एकदा तुम्ही याचा सामना केला की तुम्हाला समतोल साधता येतो. या सगळ्यापासून वेगळे होणे कठीण आहे.”

“तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुमचा जोडीदार निवडणे. योग्य जोडीदार तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो, माझ्या यशात पत्नीचा महत्त्वाचा वाटा आहे. आता जर महिला माझ्याकडे आकर्षित होत असतील तर ते माझ्या पत्नीमुळे आहे. तिच्यामुळे मी एक विशिष्ट व्यक्ती बनलो आहे.”

आयुष्मान खुरानाने माशाबल मेहफिल(Mashable Mehfil)ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले, “एक वेळ अशी होती की मी चंदीगढमध्ये लोकप्रिय मुलगा होतो, मला प्रसिद्धी मिळत होती, मला माझे आयुष्य जगायचे आहे असे म्हणून मी ताहिराबरोबर ब्रेकअप केले. सहा महिन्यांनंतर मला माझी चूक समजली आणि मी ताहिराकडे परत आलो.”

हेही वाचा: Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

२०१२ ला आयुष्मान खुरानाचा ‘विकी डोनर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला फक्त प्रेक्षकांचेच प्रेम मिळाले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. ताहिरा आणि आयुष्मान यांच्याबद्दल बोलायचे तर ते एकमेकांना शाळेपासून ओळखतात. २००८ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली, त्यांना दोन मुले आहेत.

दरम्यान, आयुष्मान ड्रीम गर्ल 2 मध्ये अनन्या पांडेसोबत दिसला होता. आता लवकरच तो एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader