आयुष्मान खुरानाने चित्रपटसृष्टीत आता स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. प्रथम रेडिओ जॉकी, नंतर टेलिव्हिजन रीयालिटि शो असा प्रवास करत बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून स्थिरवलेला आयुष्मान हा त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. हटके भूमिका, हटके विषय आणि याबरोबरच एखादा सामाजिक संदेश या समीकरणावर आयुष्मानचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले.

गेले काही दिवस मात्र आयुष्मानची जादू बॉक्स ऑफिसवर चालत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत यांचा ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला अतिशय थंड प्रतिसाद दिला आहे. आयुष्मानचा चित्रपट असल्याने याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ १.३१ कोटीची कमाई केल्याने आयुष्मानच्या कारकीर्दीतील सर्वात कमी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

vasai suicide marathi news
वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद

आणखी वाचा : “त्यांना पाहून यातना…” वडिलांच्या आर्थिक समस्यांबद्दल बोलताना आमिर खानला अश्रू अनावर

या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईच्या आकड्यातही फारशी वाढ दिसून आलेली नाही. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १.६० ते २ कोटी अशी कमाई केली आहे. आता रविवार असल्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, एकूणच या चित्रपटाचे कमाईचे आकडे पाहता यात सुधारणा होण्याची शक्यता दिसत नसल्याचं ट्रेड अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. आयुष्मानचा हा सलग पाचवा चित्रपट आहे जो बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला आहे.

याआधी ‘डॉक्टर जी’, ‘अनेक’, ;चंदीगढ करे आशिकी’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या आयुष्मानच्या चित्रपटांची अवस्था ही काहीशी अशीच होती. शिवाय सध्या कन्नड चित्रपट ‘कांतारा’ आणि अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. ‘दृश्यम २’ने १७० कोटी इतकी कमाई केली असून दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर गर्दी होताना दिसत आहे.