दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान मोठं आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका व चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. कलाक्षेत्रामध्ये आजही दिलीप कुमार यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्याचबरोबरीने त्यांची राजकीय क्षेत्रातील काही मोजक्याच मंडळींबरोब मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन आहे. त्याचनिमित्त दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीबाबत आपण जाणून घेणार आहोत. काँग्रेस या राजकीय पक्षाबरोबर दिलीप कुमार यांचे चांगले संबंध होतं. तरीही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर त्यांची मैत्री घट्ट होती. शिवसेना पक्ष स्थापन होण्यापूर्वीच या दोघांची मैत्री होती.

आणखी वाचा – तुरुंगातून बाहेर येताच थेट ‘मातोश्री’वर पोहोचला होता संजय दत्त, बाळासाहेबांना मिठी मारली अन्…

ज्येष्ठ पत्रकार व लेखक राशिद किडवई यांनी त्यांच्या ‘नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पावर इन इंडियन पॉलिटिक्स’ पुस्तकामध्ये नमुद केल्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यादेखील दिलीप कुमार यांच्या चाहती होत्या. मीनाताई यांना भेटायला दिलीप कुमार जात असत. तेव्हा त्या दिलीप कुमार यांच्या आवडीचं जेवणही बनवायचे. पण १९९८-९९ दरम्यान दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली. दिलीप कुमार यांना पाकिस्तानने निशान-ए-इम्तियाज हा तिथला सर्वात मोठा नागरिक पुरस्कार देण्याचं घोषित केलं. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी दिलीप कुमार पाकिस्तानला जाणार होते. पण बाळासाहेब ठाकरे यांनी यासाठी विरोध केला. याचं दिलीप कुमार यांना खूप दुःख वाटलं. गेल्या ३ दशकांपासून मैत्री असतानाही माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी नकार मिळत आहे हे दिलीप कुमार यांना त्यावेळी पटलं नाही.

आणखी वाचा – ‘बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ताब्यात घ्या’, प्रसाद लाड यांच्या मागणीवर फडणवीसांनी केलं भाष्य, म्हणाले “तिथे खासगी…”

यादरम्यान दिलीप कुमार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची मदत मागितली. वाजपेयी यांनी दिलीप यांना बाळासाहेब ठाकरेंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं. किडवई यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप कुमार एक कलाकार आहेत. त्यांना राजकीय वादामध्ये खेचू नये असं अटल बिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. त्यानंतर दिलीप कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आणखी वाचा – हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता- हेडली

मात्र १९९९मध्ये कारगील युद्धादरम्यान हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप कुमार यांना पुरस्कार परत करण्यास सांगितलं. तुम्ही गरिबांना खूप मदत केली आहे. अनेकांना आधार दिला आहे. या पुरस्कारामुळे भारत व पाकिस्तानमधील दरी कमी होण्यास मदत मिळेल असं दिलीप कुमार यांनी बाळासाहेबांना सांगत पुरस्कार परत करण्यास नकार दिला. दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीची आजही चर्चा रंगताना दिसते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death anniversary special his friendship with actor dilip kumar see details kmd
First published on: 17-11-2022 at 11:09 IST