scorecardresearch

‘मैने प्यार किया’ला ३३ वर्ष पूर्ण, खास व्हिडीओ शेअर करत भाग्यश्री म्हणाल्या…

२९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

‘मैने प्यार किया’ला ३३ वर्ष पूर्ण, खास व्हिडीओ शेअर करत भाग्यश्री म्हणाल्या…

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने त्या वेळचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. आता नुकतीच या चित्रपटाला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्त भाग्यश्री यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

२९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भाग्यश्री आणि सलमान खान यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटामुळे ते दोघेही स्टार बनले. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील गाणी हे सगळंच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची क्रेझ आजही तितकीच आहे. हेच भाग्यश्री यांनी एक व्हिडीओ शेअर करत दाखवलं आहे.

आणखी वाचा : “आमच्या होणाऱ्या बाळाचं नाव तू ठेव…” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर, म्हणाला, “तुम्हा दोघांना…”

भाग्यश्री यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लहान मुलांचा एक व्हिडीओ शेअर केला. यात ती लहान मुलं ‘मैने प्यार किया’ चित्रपटातलं अत्यंत गाजलेलं ‘दिल दिवाना’ हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, “‘मैने प्यार किया’ प्रदर्शित होऊन ३३ वर्षांनीही या चित्रपटाला इतकं भरभरून प्रेम मिळतंय, माझ्यासाठी आजही तुमच्या हृदयात वेगळं स्थान आहे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. सलमान खान, राजश्री फिल्म्स, सुरजजी आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमशिवाय हे शक्य झालं नसतं. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे.”

हेही वाचा : “जा सुमन जी ले अपनी जिंदगी”; भाग्यश्रीला सांगतात तिची मुलं

या चित्रपटानंतर अनेक वर्ष भाग्यश्री मनोरंजनसृष्टीपासून दूर होत्या. २०१९ साली ‘सिथाराम कल्याण’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी मनोरंजन सृष्टीत कमबॅक केला. या सोबतच त्या पूजा हेगडे आणि प्रभास यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटातही दिसल्या. तसंच या वर्षाच्या सुरुवातीला ‘डीआयडी सुपर मॉम्स’ कार्यक्रमाच्या परीक्षकाची भूमिका त्यांनी बजावली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 13:42 IST

संबंधित बातम्या