Bhumi Pednekar Share Health Fitness : मनोरंजन विश्वात काम करणारी अनेक कलाकार मंडळी सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकार करताना दिसतात. शिवाय अनेक कलाकार हे भूमिकांसाठीही शरीरावर मेहनत घेताना दिसतात. अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री आहे, जिने भूमिकेसाठी वजन वाढवलं आणि नैसर्गिकरित्या ते कमीसुद्धा केलं. अभिनेत्रीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी होता, ही अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर

२०१५ मध्ये आलेल्या ‘दम लगाके हायशा’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्या भूमिकेसाठी तिने तब्बल ३० किलो वजन वाढवलं होतं. मात्र नंतर, तिने कोणत्याही शॉर्टकटशिवाय वाढवलेलं ३५ किलो वजन कमीही केलं. News18 Showsha च्या कार्यक्रमात भूमीने स्वत:च्या फिटनेसबद्दल सांगितलं.

स्वत:च्या फिटनेस आणि आहाराच्या सवयींबाबत भूमी असं म्हणाली “खूप लोक चरबीयुक्त (फॅट) पदार्थ खाण्यास घाबरतात. पण मी माझ्या आहारात नियमितपणे हे पदार्थ खाते. विशेषतः मी आहारात तुपाचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. फक्त फरक इतकाच की, मी तुपात अन्न शिजवत नाही, ते कच्चं खाते. तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.”

दरम्यान, या कार्यक्रमात भूमीने सर्जरी, बोटॉक्स आणि फिलर्सबाबतही तिचं मत व्यक्त केलं. ‘द रॉयल्स’ या वेबसीरिजमधील लुकबाबत भूमीला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. याबद्दल अनेकांनी तिने सर्जरी केल्याचं म्हटलं होतं.

याबद्दल भूमीने असं म्हटलं, “माझ्या मते, आपण अशा काळात राहतो, जिथे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे निर्णय घ्यायला हवेत. कोणाला काय करायचं आहे; यावर मी किंवा इतर कुणीही निर्णय देण्याचा अधिकार नाही आणि खरंतर यावर खूपच जास्त चर्चा होते आहे. कोणाला फिलर्स घ्यायचे असतील, तर त्याने का घेऊ नये?”

भूमी पेडणेकर इन्स्टाग्राम पोस्ट

भूमी पेडणेकर ही नुकतीच ‘नेटफ्लिक्स’वरील ‘द रॉयल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली. या सीरिजमध्ये भूमी आणि ईशान खट्टर यांसह झीनत अमान, नोरा फतेही, साक्षी तन्वर या कलाकारांचाही समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर भूमी ‘दलदल’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भूमी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सीरिजचं चित्रीकरण पूर्ण झालं असून लवकरच तिच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होणार आहे. त्यामुळे भूमीचे अनेक चाहते या सीरिजसाठी उत्सुक आहेत.