अभिनेत्री भूमी पेडणेकरने विविध प्रकारच्या भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच भूमीने गोव्यात स्वत:चे नवीन रेस्टॉरंट सुरु केले. या निमित्ताने अभिनेत्रीने ‘कर्ली टेल्स’च्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी भूमीने तिच्या वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टींवर भाष्य केले.

हेही वाचा : अलिबागमध्ये तयार होणार विराट-अनुष्काचं आलिशान फार्महाऊस, किंमत ऐकून व्हाल थक्क

भूमी पेडणेकरला तिच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाबद्दल विचारण्यात आल्यावर अभिनेत्री म्हणाली, “शिक्षण पूर्ण झाल्यावर मी यशराज फिल्म्समध्ये इंटर्नशीप करायला सुरुवात केली. अनेकदा मी चित्रपटांसाठी ऑडिशन घ्यायचे आणि असा माझा सिनेविश्वातील प्रवास सुरु झाला. ‘दम लगा के हईशा’मधील भूमिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली.”

हेही वाचा : “…तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं”, चिन्मय मांडलेकरने सांगितला किस्सा; म्हणाला, “महाराजांची भूमिका साकारणे…”

भूमीला पुढे तिच्या पहिल्या कमाईबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, “आयुष्यातील पहिली नोकरी मी ‘यशराज फिल्म्स’मध्ये केली आणि या कामाचे मानधन म्हणून मला ७ हजारांचा चेक देण्यात आला होता. तो चेक मी घरी गेल्यावर माझ्या आईकडे दिला त्यामुळे त्या पैशांचे मी काय केले हे मला खरंच आठवत नाही. मला अजूनही मी पैशांचे नियोजन कसे करते याबद्दल फारसे आठवत नाही.”

हेही वाचा : “कॉलेजमध्ये प्रचंड खोडकर, नॉनसेन्स अन्…”, समीर वानखेडेंनी केला क्रांती रेडकरबद्दल खुलासा; म्हणाले, “मला राग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भूमी पेडणेकर लवकरच ‘द लेडी किलर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी अभिनेत्रीने ‘भीड’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.