बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान गाजतो आहे. या चित्रपटात सलमानच्या गाजलेल्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील अभिनेत्री भूमिका चावलाचीही झलक बघायला मिळत आहे. ‘तेरे नाम’ चित्रपटातून भूमिका चावलाच्या करिअरला चांगलीच गती मिळाली. पण तुम्हाला ठाऊक आहे की दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या सुपरहीट चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये भूमिका चावलाने याबद्दल खुलासा केला आहे. यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननशी चर्चा करताना भूमिकाने तो कोणता चित्रपट होता हे स्पष्ट केलं आहे. आजवर बऱ्याच चित्रपटात भूमिकाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं होतं, पण ‘जब वी मेट’ या चित्रपटातील भूमिका करीना कपूरच्या वाट्याला गेल्याचं अभिनेत्रीला वाईट वाटतं हे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

आणखी वाचा : ‘३ इडियट्स’मधल्या ‘सुहास’ची ट्विटर युझरने का मागितली माफी? अभिनेत्याचं उत्तर वाचून व्हाल चकित

याविषयी बोलताना भूमिका म्हणाली, “मला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, पण तेव्हा त्याबाबतीत बरीच चोखंदळ होते. मी एक मोठा चित्रपट साईन केला होता, दुर्दैवाने त्याचा निर्माता बदलला, हीरो बदलला, चित्रपटाचं नावदेखील बदललं, सगळंच बदललं आणि मग हिरॉईनसुद्धा बदलली. जर मी ती भूमिका केली असती तर ती माझ्यासाठी खूप वेगळी ठरली असती, अखेर जे होतं चांगल्यासाठीच होतं.”

आणखी वाचा : Photos : बाहुबलीमधील ‘देवसेना’ आहे तरी कुठे? सलग फ्लॉप चित्रपट देणारी अनुष्का शेट्टी कमबॅक करणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे भूमिका म्हणाली, “मला आयुष्यात हातातून चित्रपट निसटल्याची एकदाच खंत वाटली होती जेव्हा ‘जब वी मेट’ माझ्या हातून गेला. यासाठी मी आणि बॉबी देओल पहिली पसंती होते. नंतर शाहिद कपूर आणि माझं नाव समोर आलं. त्यानंतर शाहिद कपूर आणि आयेशा टाकीया ही जोडी सुचवण्यात आली अखेर ती भूमिका करीना कपूरच्या पदरात पडली. ठिके मला त्याबद्दल वाईट नक्कीच वाटतं, पण मी याचा जास्त विचार करत नाही.” इतकंच नव्हे तर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधूनही भूमिकाला काढण्यात आलं होतं हेदेखील तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.