बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानने ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये एण्ट्री केली. साजिदचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाणं कलाक्षेत्रामधील काही अभिनेत्रींना अजिबात पटलेलं नाही. सतत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहेत. प्रेक्षकांकडूनही साजिदला घराबाहेर काढा अशी मागणी होत आहे. ‘हॅशटॅग मीटू’ प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या साजिदबाबत अजूनही काही धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. पण साजिदची बहिण दिग्दर्शक-कोरिओग्राफर फराह खान मात्र आपल्या भावाच्या पाठिशी उभी आहे.

आणखी वाचा – घरी बोलावलं, सेक्सबाबत प्रश्न विचारला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप

‘हॅशटॅग मीटू’ प्रकरणामुळे साजिदचा खरा चेहरा समोर आला असल्याचं काही अभिनेत्री सातत्याने बोलत आहेत. शर्लिन चोप्रा, राणी चॅटर्जी सारख्या अभिनेत्रींनी साजिदवर लैगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. कामानिमित्त घरी बोलावून आपल्याबरोबर साजिदने गैरवर्तन केलं असल्याचं या अभिनेत्रींचं म्हणणं आहे. पण फराहला मात्र भावालाच पाठिंबा द्यायचा आहे अशी चर्चा आहे.

‘बिग बॉस १६’च्या जवळच्या सुत्रांनी ‘बॉलिवूड लाईफ डॉट कॉम’ला दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खान साजिद खानला घराबाहेर काढण्यासाठी तयार झाला आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये साजिद घराबाहेर येईल अशी चर्चा आहे. सलमानच्या जवळच्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर एक वेगळीच बाब सगळ्यांसमोर आली आहे.

आणखी वाचा – Video : “२० वर्ष त्याने आमची साथ दिली अन्…” श्वानाचा मृत्यु झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली अभिनेत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साजिदची बहिण फराह खानशी सलमानचे जवळचे संबंध आहेत. माझ्या भावाल मदत कर असं तिने सलमानला सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. पण प्रेक्षक मात्र साजिदला घराबाहेर काढण्याची जोरदार मागणी करत आहेत. आता येत्या काही दिवसांमध्ये ‘बिग बॉस १६’मध्ये काय घडणार? खरंच सलमान साजिदला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.