Bollwyood producer lost his mansion and business: भारतीय सिनेसृष्टीला आता जवळजवळ १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, याची सुरूवात १९४० च्या दरम्यान झाली होती. त्यावेळी निर्माते, दिग्दर्शक या चित्रपट व्यवसायामध्ये नवीन होते.

बॉलीवूडच्या’ निर्मात्याने गमावलेली संपत्ती

फाळणीनंतर बरेच कलाकार नुकतेच मुंबईत आले होते. त्यामुळे कलाकारांमध्ये तितके जिव्हाळ्याचे संबंध नव्हते. बॉलीवूडचा गाजलेला सिनेमा शोलेचे निर्माते जी.पी. सिप्पी हे त्यापैकी एक आहेत. जी.पी. सिप्पी कराचीतील एका श्रीमंत कुटुंबातील होते. पण फाळणीदरम्यान, ते कुटुंबासह मुंबईत आले. कराचीमधील मालमत्ता, त्यांची संपत्ती त्यांना मागे सोडावी लागली. कराचीमध्ये त्यांनी श्रीमंतीत आयुष्य जगले होते. मात्र, मुंबईत आल्यानंतर ते बेघर झाले होते.

कुटुंबाचे पालनपोषन करण्यासाठी त्यांना नव्याने सुरुवात करावी लागली. न्यू यॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, जीपी सिप्पी कार्पेट विकायचे, मिळालेल्या पैशातील काही पैसे वाचवले आणि एक रेस्टॉरंट सुरू केले. पण, त्यातून त्यांना काही साध्य झाले नाही.

याचदरम्यान, त्यांना एक कुलाब्यामध्ये अर्धवट बांधकाम झालेले एक घर दिसले. त्यांनी ते घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. ते घर त्यांना जास्त किंमतीने विकायचे होते. त्यातूनच त्यांना कन्स्ट्रक्शन व्यवसायची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी चित्रपटात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. १९५३ साली त्यांनी पहिल्यांदा ‘सजा’ या चित्रपटात निर्माते म्हणून भूमिका निभावली.

या चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटात गुंतवणूक केली. मात्र, एका काळानंतर त्यांनी बी ग्रेड चित्रपटाचे निर्माते म्हणून काम केले. त्यांनी अभिनय व दिग्दर्शनातदेखील प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यामध्ये फारसे यश मिळाले नाही. जेव्हा त्यांना जाणीव झाली की ते गुंतवणूक करत असलेल्या चित्रपटातून त्यांना फारसा फायदा मिळत नाही, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला परदेशातून पुन्हा भारतात बोलावले. त्यांचा मुलगा म्हणजे रमेश सिप्पी हे लंडन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिक्षण घेत होते. मात्र, जी पी सिप्पी यांनी त्यांना भारतात बोलावले आणि त्यांच्या व्यावसायाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

जेव्हा रमेश सिप्पी यांनी त्यांच्या व्यावसायची जबाबदारी घेतली. तेव्हा त्यांच्या कंपनीने सीता और गीता, अंदाज असे चित्रपट बनवले. मात्र, शोले या चित्रपटातून त्यांना मोठे यश मिळाले.

१९६५ साली शोले सिनेमा ३ कोटींमध्ये बनला. या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी बदलल्या. या चित्रपटात संजीव कपूर, अमिताभ बच्चन , धर्मेंद्र , अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा त्या काळातील सर्वात मोठा हिंदी सिनेमा बनला. शोले चित्रपटाची कथा सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिली होती.

‘शोले’ हा चित्रपट पाच वर्षे चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची जागा सिप्पी यांनी निर्मिती केलेल्या शान या चित्रपटाने घेतली. त्यानंतर त्यांनी डिंपल कपाडिया यांच्या ‘सागर’ या चित्रपटाची निर्मितीही केली. नंतरच्या काळात त्यांनी ‘पत्थर के फूल’, ‘राजू बन गया जेंटलमन’ आणि इतर चित्रपटांची निर्मिती केली. जी पी सिप्पी यांचे २००७ मध्ये ९३ व्या वर्षी निधन झाले.