बॉलीवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने ३ जानेवारी २०२४ रोजी नुपूर शिखरेबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह केला. आता आयरा व नुपूर पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान नुकताच आयरा व नुपूरचा मेहंदी व संगीत सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

७ जानेवारीपासून आयरा व नुपूरच्या लग्नाअगोदरच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. ८ जानेवारीला दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आपल्या मेहंदी कार्यक्रमासाठी आयराने पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला होता. तर नुपूरने गुलाबी रंगाचा शर्ट व जॅकेट घातले होते. या लूकमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत होते. आयरा व नुपूरने हातातवर मेंदीने आय व एन काढले होते.

हेही वाचा-लहानपणी हृतिक रोशनला झाला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: केलेला खुलासा म्हणाला, “शाळेत माझे मित्र…”

आयराच्या मेहंदी कार्यक्रमादरम्यानचा आमिरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये आमिर लाडक्या लेकीच्या मेहंदी कार्यक्रमात आपल्या हातावर मेहंदी काढून घेताना दिसत आहे. आमिरने आपल्या हातावर मेहंदीने छोटीशी पण गोड डिझाईन काढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयपूरमध्ये आयरा व नुपूरच्या लग्नानंतर मुंबईतमध्ये भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. १३ जानेवारीला मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये या रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच काही तेलगू कलाकारांनाही आमिरने या रिसेप्शन पार्टीचे निमंत्रण दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.