Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधील तुर्कीच्या एका नेमबाजाची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत युसूफ डिकेक (Yusuf Dikec) या नेमबाजाने रौप्य पदक जिंकले. युसूफ पदक जिंकल्यावर सोशल मीडियावर काही जण एका बॉलीवूड अभिनेत्याचं अभिनंदन करत आहेत. या अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तुर्कीचा ५१ वर्षांचा नेमबाज युसूफ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फक्त हातात पिस्तुल घेऊन खेळ सादर करायला आला. डावा हात खिशात घालून उजव्या हाताने सहज खेळ सादर करून त्याने रौप्य पदक पटकावलं. यावेळी त्याने डोळ्यांवर विशेष लेन्स, एका डोळ्याला कव्हर व कानांवर हेडफोन यापैकी कोणत्याही ॲक्सेसरीज वापरल्या नाहीत. त्याने फक्त त्याचा डोळ्यांचा चश्मा लावला होता व एका हातात पिस्तुल होती. त्याने अगदी सहज नेम साधत हे रौप्य पदक जिंकलं. त्याचा या लूकमधील फोटो खूपच व्हायरल होत आहे. त्याने हे पदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर युजर एका बॉलीवूड अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत. या अभिनेत्याने पोस्टला उत्तर दिलं आहे.

Paris Olympics 2024 Yusuf Dikec : एक हात खिशात घालून धरला नेम; तुर्कियेच्या ५१ वर्षीय पठ्ठ्यानं जिंकलं रौप्य पदक

आदिल हुसैन यांनी युजरच्या पोस्टवर दिली प्रतिक्रिया

रौप्य पदक जिंकल्यावर युसूफ डिकेकऐवजी बॉलीवूड अभिनेता आदिल हुसैन (Adil Hussain) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. “आदिल हुसैन यांनी २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये तुर्कीसाठी रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन,” असं कॅप्शन देत एका युजरने युसूफ व आदिल यांचे फोटो शेअर केले होते. आदिल यांनीही या पोस्टला मजेशीर उत्तर दिलं. “हे खरं असतं तर.. कदाचित सराव करायची वेळ अजून गेलेली नाही. माझ्याजवळ अॅटिट्यूड आहेच, आता स्किल सेटवर थोडं काम करतो,” असं उत्तर त्यांनी या युजरला दिलं आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Adil Hussain reaction on being compared with shooter yusuf dikec
एक्स युजरची पोस्ट व आदिल हुसैन यांनी केलेला रिप्लाय (फोटो- स्क्रीनशॉट)

आदिल हुसैन यांनीएका मुलाखतीत याबद्दल प्रतिक्रिया दिली. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना ते म्हणाले, “गैरसमजातून ती पोस्ट केली होती, असं मला वाटत नाही. ती जाणीवपूर्वक करण्यात आली होती. ती पोस्ट गमतीत केलेली होती, त्यामुळे ते पाहून मला आश्चर्य वाटलं नाही, पण मला मजेदार वाटली.”