बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागच्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. त्याचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. जगभरात या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. आज शाहरुख खानबरोबर काम करण्यासाठी अभिनेता, अभिनेत्री काम करण्यासाठी तयार असतात मात्र एकेकाळी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला त्याच्याबरोबर काम करायचे नव्हते

‘जो जिता वही सिकंदर’, ‘आशिकी’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता म्हणजे दीपक तिजोरी, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने नव्व्दच्या दशकातील चित्रपटांविषयी आणि शाहरुख खान विषयी भाष्य केलं आहे. तो असं म्हणाला, “मला कभी हा कभी ना हा चित्रपट करायचा नव्हता कारण त्यावेळी शाहरुख, कुंदन, अझीझ मिर्झा, सईद मिर्झा यांचा एक कंपू होता आणि मी राहुल भट्ट, विक्रम भट्ट, पूजा भट्ट असा आमचा एक कंपू होता. आज जसे आपल्याकडे कंपू आहेत तसेच तेव्हादेखील होते.”

‘हेरा फेरी ३’ च्या सेटवरचा फोटो व्हायरल; बाबुराव, श्याम व राजूची पहिली झलक पाहिलीत का?

तो पुढे म्हणाला, “जेव्हा मला कळले की शाहरुखला हिरो म्हणून लॉन्च करणार आहेत, तेव्हा मला वाटले इथे माझ्यासाठी धोका आहे. मला अजिबात सहभागी व्हायचं नव्हतं. पण मी दिग्दर्शक कुंदन शाह यांचा चाहता होतो मला त्यांच्याबरोबर काम करायचे होते. जेव्हा मला त्यांचा फोन आला मी त्यांना लगेच होकार दिला नाही कारण शाहरुख खानला त्यात हिरो म्हणून लाँच करणार होते, मी थोडा घाबरलो होतो. मात्र दिग्दर्शकाने शेवटी मला ती भूमिका करण्यासाठी भाग पाडले.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानचा ‘कभी हा कभी ना’ चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. शाहरुख व्यतिरिक्त या चित्रपटात आशुतोष गोवारीकर. दीपक तिजोरी, नसरुद्दिन शाह,सतीश शाह असे दिग्गज कलाकार यात होते. चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.