हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांच्या जाण्यावर प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने भाष्य केलं आहे.

गोविंदा व सतीश कौशिक या जोडीने मोठ्या पडद्यावर धमाल उडवून दिली होती, दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. इटाईम्सशी बोलताना गोविंदा असं म्हणाला, “मी गेल्या २५ वर्षांपासून त्याला ओळखतो. आम्ही अनेकदा एकत्र काम केले आणि प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला. त्याची विनोदाचे टायमिंग आणि त्याचे संवाद लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. अशा दुःखाच्या वेळीही त्यांनी साकारलेली पात्रं तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतात. एक अभिनेता म्हणून त्याचे हे कर्तृत्व आहे.”

सतीश कौशिक यांच्या ‘पप्पू पेजर’ या अजरामर पात्राचं कनेक्शन आहे ऋषी कपूर यांच्या सुपरहिट चित्रपटाशी; अभिनेत्यानेच केलेला खुलासा

गोविंदा पुढे म्हणाला, “आम्ही शेवटचे इंडियन आयडॉलच्या सेटवर भेटलो होतो. तो त्याच्या क्राफ्टवर काम करायचा. त्याने अनेक चित्रपटात फुकट काम केलं आहे. आंटी १ चित्रपटात त्याने एकही पैसे घेतला नव्हता, आम्ही आग्रह केला त्याला पैसे घेण्यासाठी. खूपच उदार मनाचा माणूस होता.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूला एका वेगळे वळण लागले आहे. दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांच्या निधनानंतर तपास करत आहे. चौकशीसाठी ते सतीश कौशिक यांनी ज्या फार्महाऊसमध्ये होळी पार्टीला हजेरी लावली होती, तिथे पोहोचले. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, तपास पथकाने फार्महाऊसमधून काही संशयास्पद औषधं जप्त केली आहेत. “फार्महाऊसमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, जे एका उद्योगपतीच्या मालकीचे होते,” असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलीस सध्या सतीश कौशिक यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची वाटत पाहत आहेत.