Sunita Ahuja On Emotional & Physical Cheating : बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा कायमच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी त्या शेअर करताना दिसतात. अशातच त्यांनी एका मुलाखतीत इमोशनल चिटिंग आणि फिजिकल चिटिंग याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीत त्यांना इमोशनल चिटिंग आणि फिजिकल चिटिंग (शारीरिक आणि मानसिक फसवणूक) यापैकी कोणत्या गोष्टीमुळे जास्त दुःख होतं, असा प्रश्न विचारण्यात आला.
काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या एका शोमध्ये जान्हवी कपूरला विचारण्यात आले होते की, रिलेशनशिपमध्ये फिजिकल चिटिंग किंवा इमोशनल चिटिंग माफीलायक आहे का? यावर सुनीता आहुजा पिंकविलाच्या मुलाखतीत म्हणाल्या, “इमोशनल चिटिंग… इमोशनल चिटिंगमुळे खूप दु:ख होतं. तुम्ही इमोशनल असता, त्या व्यक्तीवर प्रेम करता आणि नंतर त्या व्यक्तीला धोका देणं खूप चुकीचं आहे, कारण मी खूप इमोशनल आहे.”
यानंतर सुनीता सांगतात, “मी गोविंदावर आयुष्यभर प्रेम करत राहीन, पण इमोशनली मला जर कुणी धोका दिला, मग तो माझा पती असो किंवा माझी मुलं असो… तर मी खूप दु:खी होईन. कोणत्याही नात्यात इमोशनल चिटिंग असू नये, ते खूप वाईट आहे.” त्यानंतर सुनीता यांना ‘फिजिकल चिटिंग करणं योग्य आहे का?’ असं विचारलं गेलं.
फिजिकल चिटिंगबद्दल सुनीता आहुजा म्हणाल्या, “फिजिकल चिटिंग करणंदेखील योग्य नाही. दोन्हीपैकी काहीही करू नका, हे योग्य नाही. आमच्यावर जे संस्कार झाले आहेत, त्यानुसार हे सगळं चूक आहे. यालाच घोर कलियुग म्हणतात. माझाही प्रेमविवाह झाला आहे. तेव्हाच मला आईने एक सल्ला दिला होता की तुझं प्रेम आता फक्त तुझ्या नवऱ्यावरच असलं पाहिजे. आम्ही अशा संस्करांत वाढलो आहोत. गोविंदा आणि माझ्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत आणि इतक्या वर्षांत कोणत्याही जोडप्यांत फक्त प्रेमच राहणार असं नाही. अनेकदा भांडणं-वादविवाद होतात, यामुळे मी माझं सामान बांधून माझ्या माहेरीसुद्धा गेली आहे. पण, आजपर्यंत मी सासर सोडलं नाही.”
सुनीता आहुजा इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे सुनीता सांगतात, “हे फिजिकल चिटिंग किंवा इमोशनल चिटिंग वगैरे मला समजत नाही. इमोशनल आणि फिजिकल चिटिंग दोन्ही खूप वाईट गोष्ट आहे. हे होणं अगदी चुकीचं आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला धोका देत असाल, तर तुम्हाला तुमच्या पार्टनरची किंमत नाही हेच दिसत. चिटिंगच करायची आहे, मग तुम्ही लग्न का केलं? या चिटिंगमध्ये मग ते स्त्रीने पुरुषाबरोबर केलेलं असो किंवा पुरुषाने एखाद्या स्त्रीबरोबर केलेलं चिटिंग असो, हे कोणीच कुणाबरोबर केलं नाही पाहिजे.”
