अभिनेता जॉन अब्राहमने स्वतःच्या बळावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. जॉनने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मग ती भूमिका कॉमेडी असो किंवा रोमँटिक. प्रत्येक भूमिका त्याने उत्कृष्टरित्या निभावल्या आहेत. जॉनने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशा या सुपरहिट जॉनने मुंबईत आलिशान बंगला खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे.

जॉन अब्राहमने मुंबईतील खारमध्ये लिंकिंग रोड येथे बंगला खरेदी केला आहे. IndexTap.comच्या माहितीनुसार, अभिनेत्याने २७ डिसेंबर २०२३ला ७०.८ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. स्टॅम्प ड्यूटीचे ४.२५ कोटी रुपये दिले होते. जॉनने खरेदी केलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ७ हजार ७२२ स्क्वेअर फूट आहे. तर बंगल्याचे क्षेत्रफळ ५, ४१६ स्क्वेअर फूट आहे. जॉन या मालमत्तेबाबत काय योजना आखणार आहे? याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. याआधी ही मालमत्ता प्रवीण नाथलाल शाह अँड फॅमिलीची होती. इ-टाइम्सच्या वृत्तानुसार, जॉनची मालमत्ता लिंकिंग रोडच्या एका प्राइम भागात आहे.

हेही वाचा – “मालकीणबाई…”, हेमंत ढोमेने बायको क्षिती जोगला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला, “आपल्या लाईफची…”

काही महिन्यापूर्वीच अभिनेत्री प्रीती झिंटाने पाली हिल येथे १७.०१ कोटी रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केला होता. याशिवाय गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी फ्लॅट आणि बंगले खरेदी केले होते.

हेही वाचा – Video: “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…”, म्हणत प्रसाद ओकने नवीन वर्षी दाखवली नव्या घराची झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जॉन अब्राहमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात जॉन नकारात्मक भूमिकेत दिसला होता. पण तरीही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती.