ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना डिस्चार्ज मिळाला आहे. १० फेब्रुवारीला त्यांना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे कोलकात्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर ब्रेन स्ट्रोक आला असल्याचे समोर आले होते. आता मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून नुकतेच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिथुन चक्रवर्तींना फोन करत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

हेही वाचा- रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

रुग्णालयातून घरी आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “मी एकदम ठीक आहे, मला फक्त माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मी लवकरच कामाला पुन्हा सुरुवात करेन. कदाचित उद्यापासूनच मी कामावर परतेन.”

मिथुन चक्रवर्ती यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोन केला आहे. मिथुन म्हणाले, “रविवारी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. मी माझ्या प्रकृतीची काळजी घेत नसल्यामुळे ते माझ्यावर ओरडले.”

हेही वाचा- ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसह आमिरचा मुलगा जुनैद खान करणार रोमान्स; चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन चक्रवर्ती यांनी आत्तापर्यंत हिंदीबरोबर, बंगाली, ओडिया, भोजपुरी आणि तमिळ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जवळपास ३५० चित्रपटांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच मिथुन चक्रवर्ती राजकारणातही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. २०२१ मध्ये कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात त्यांंनी प्रवेश केला. २०२४ मध्ये त्यांना या देशातील तिसरा सर्वोच्च नागरी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.