बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’ हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यातील गाणी आणि एकूणच तो चित्रपट बॉयकॉट करायची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

‘पठाण’च्या ट्रेलरने शाहरुखच्या चाहत्यांना खुश केलंच आहे, पण आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुखने त्याचं स्थान मिळवलं आहे. बड्याबड्या कलाकारांना मागे टाकत शाहरुखने हे स्थान मिळवलं आहे.

आणखी वाचा : “द काश्मीर फाइल्सला व्हल्गर आणि प्रोपगंडा म्हणणारे…” ऑस्कर २०२३ मधील एन्ट्रीनंतर मिथुन चक्रवर्ती यांची खरमरीत प्रतिक्रिया

या यादीत शाहरुख चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या ३ दशकांपासून शाहरुख प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीनुसार शाहरुख खानची संपत्ती ७७० मिलियन डॉलर म्हणजेच ६३०६ कोटी एवढी आहे. या यादीत शाहरुख खानने टॉम क्रुज, जॅकी चॅन, जॉर्ज क्लूनी, रॉबर्ट डी नेरोसारख्या प्रसिद्ध कलाकारांना मागे टाकलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या ब्रॅंडसाठी काम करतो, शिवाय त्याने स्वतःची क्रिकेट टीम आणि व्हीएफएक्स कंपनीसुद्धा स्थापन केली आहे. आता शाहरुख ‘पठाण’सारख्या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. यामध्ये शाहरुखसह दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे.