Premium

“कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…,” पत्नी कियाराचा उल्लेख करीत सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला ‘तो’ फोटो

सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीचा उल्लेख करीत केली खास पोस्ट

sidharth malhotra kiara advani
सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीचा उल्लेख करीत केली खास पोस्ट ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या वर्षी ७ फेब्रुवारीला या जोडीने लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-कियारा एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जपानला गेले आहेत. दोघांनीही या ट्रिपदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सिद्धार्थच्या अशाच एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सलमान की शाहरुख कोणाला निवडशील? आमिर खान उत्तर देत म्हणाला, “भाई तो कभी डूबेंगे नही…”; ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ मल्होत्राने इन्स्टाग्रामवर कियाराच्या सर्व शॉपिंग बॅगचे ओझे उचलतानाचा फोटो शेअर करून त्यास “मी माझे ‘पती कर्तव्य’ पूर्ण करीत आहे” असे हटके कॅप्शन देत पत्नी कियारा अडवाणीला टॅग केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिद्धार्थ पाठमोरा उभा असून त्याने हातात एका वेळी तीन मोठ्या शॉपिंग बॅग्ज घेतल्या आहेत.

हेही वाचा : “नऊ वर्षांचा शाहिद कपूर होता मुलीच्या प्रेमात…” अभिनेत्याच्या सावत्र वडिलांचा खुलासा; म्हणाले, “त्या मुलीबरोबर लग्न…”

सिद्धार्थने आणखी फोटो शेअर करीत त्यास, “बॅग्ज उचलण्यापूर्वी मला रेस्टॉरंटमध्ये ही छानशी ट्रिट दिल्याबद्दल धन्यवाद कियारा…” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ बर्गर खाताना दिसत आहे. लग्नगाठ बांधल्यापासून सिद्धार्थ-कियारा कायम असे हटके, मजेशीर फोटो शेअर करीत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात.

हेही वाचा : “कोहली आज तो रन बना लै…” भर कार्यक्रमात अनुष्का शर्माने नवऱ्याची उडवली खिल्ली; उत्तर देत विराट म्हणाला…

दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच रोहित शेट्टीच्या आगामी ‘इंडियन पोलीस फोर्स’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्याबरोबर झळकणार आहे. तसेच कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जून रोजी रिलीज होणार असून यामध्ये ती ‘भूल भुलैया २’नंतर पुन्हा एकदा कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 16:28 IST
Next Story
अमृता सिंहने खरेदी केला महागडा टॉवेल, लेक सारा अली खानने घेतली आईची शाळा; विकी कौशलने सांगितला ‘तो’ किस्सा