बॉलीवूडमधील क्यूट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं नवं घर मुंबईतील वांद्रे येथे तयार होतं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आलिया, रणबीरच्या या नव्या घराचं बांधकाम जोरदार सुरू आहे. माहितीनुसार, २५० कोटींचा खर्च करून कपूर कपल हे नवं घर तयार करत आहे. त्यामुळे कधी रणबीर, कधी आलिया तर कधी नीत कपूर घराच्या बांधकामाची पाहणी सातत्यानं करत आहेत. आज सकाळी-सकाळी आलिया आपल्या लाडक्या लेकीला म्हणजेच राहाला कडेवर घेऊन नव्या घराची पाहणी करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबतीला रणबीर कपूर व नीतू कपूर देखील होत्या. यासंबंधित अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत.

माहितीनुसार, आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या नव्या घराचं बांधकाम जवळपास झालं आहे. रंग काम आणि इलेक्ट्रिक फिटिंगचं काम झालं आहे. आलिया स्वतः आपल्या आवडीनं आणि गरजेनुसार नव्या घराच्या इंटिरियरचं काम करत आहे. या नव्या घरात वेगळा पार्किंग एरिया असणार आहे. तसंच मोठं टेरेस देखील होणार आहे. याशिवाय रणबीरनं नव्या घरात वडील ऋषी कपूर यांच्या अविस्मरणीय आठवणीसाठी खास जागा सोडली आहे.

हेही वाचा – Video: ८०-९०च्या दशकात बॉलीवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखंत का? प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकासह केलेल्या सुंदर नृत्याने वेधलं लक्ष

आज सकाळी कपूर कुटुंब हे भविष्यातलं सुंदर व आलिशान घराच्या पाहणीसाठी पोहोचलं होतं. याचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये आलिया राहाला कडेवर घेऊन घराची पाहणी करताना दिसत आहे. यावेळी रणबीर कपूर व नीतू कपूर देखील पाहणी करताना पाहायला मिळत आहेत. पण नेहमी प्रमाणे गोंडस राहाच्या हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आलियासारखी राहा देखील असल्याचं चाहते प्रतिक्रियेद्वारे म्हणताना दिसत आहेत. वांद्रे येथील नव्या घराची पाहणी करतानाचे आलिया, रणबीर, नीतू कपूर व राहाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी असं वृत्त आलं होतं की, आलिया व रणबीरनं वांद्रे येथील हे नवं घर राहाच्या नावे केलं आहे. आता हे घर जवळपास तयार झालं असून यंदाच्या दिवाळीमध्ये कपूर कुटुंब या नव्या घरात प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा – Video: मराठी अभिनेत्याचा स्विमिंग पूलमध्ये ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर मजेशीर डान्स, हटके स्टेप्सनं वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया व रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीच्या ‘जिगरा’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. लवकरच आलियाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दुसऱ्या बाजूला रणबीरचं सध्या ‘रामायण’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाचं चित्रीकरण रणबीर जुलै महिन्यात पूर्ण करेल. या चित्रपटात अभिनेता प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.