आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘राझी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘ब्रम्हास्त्र’ यांसारख्या चित्रपटातून आलियाने अभिनयाचा ठसा उमटवला. मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या आलियाने स्वत:ला एक खास भेट दिली आहे. आलियाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.

आलियाने याच महिन्यात बहीण शालीन भट्टला दोन फ्लॅट गिफ्ट केले होते. या २०८६.७५ स्केअर फूट या फ्लॅटची किंमत सुमारे ७.८६ कोटींच्या घरात आहे. जुहूमधील एका अपार्टमेंटमध्ये आलियाने शाहीनला भेट म्हणून दिलेले फ्लॅट खरेदी केले आहेत. या फ्लॅटच्या स्टॅम्प ड्युटीसाठी आलियाने तब्बल ३०.७५ लाख रुपये मोजले आहेत.

हेही वाचा>> केदार शिंदेंच्या लेकीने शेअर केला शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो, दोघांमधील नेमकं नातं काय?

बहीण शालीनला महागडे फ्लॅट गिफ्ट केल्यानंतर आलियाने स्वत:साठी मुंबईतील वांद्रे परिसरात आलिशान घर घरेदी केलं आहे. २४९७ स्केअर फूटचं घर आलियाने खरेदी केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलियाची प्रोडक्शन कंपनी ‘इंटरनॅशनल सनशाइन प्रोडक्शन प्रायव्हेटेड लिमिटेड’ कडून हे घर खरेदी करण्यात आलं आहे. या घराची किंमत ३७.८० कोटी इतकी आहे. तर घर खरेदी करण्यासाठी आलियाने २.२६ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> रीलवर ट्रेंडिंग ‘बहरला हा मधुमास’ची गायिका कोण माहितीये का? प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेने गायलं आहे गाणं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या आलिया पती रणबीर कपूर व कुटुंबीयांसह वांद्रे येथील वास्तू या बंगल्यात राहत आहे. याच बंगल्यात तिने रणबीर कपूरसह लग्नगाठ बांधली होती. लवकरच आलिया-रणबीर कृष्णाराज बंगल्यात राहायला जाणार आहेत. या बंगल्याचं काम सुरू असून दोघेही तिथे पाहणी करण्यासाठी जात असतात.