बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. नुकताच त्याचा ‘तू झुटी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याने पहिल्यांदा श्रद्धा कपूरबरोबर काम केले आहे. मात्र या चित्रपटात श्रद्धा ऐवजी रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड काम करणार होती. मात्र तिने नकार दिला आणि ती भूमिका श्रद्धाच्या पदरात पडली.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर चित्रपटांप्रमाणे त्याच्या खासगी आयुष्यामुळे, लव्ह लाईफमुळे चर्चेत येत असतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोणला ही भूमिका विचारण्यात आली होती मात्र तिने नकार दिला आणि अखेर श्रद्धा कपूरला ही भूमिका मिळाली. यामागचं कारण सांगितलं जात आहे की चित्रपटाच्या दिग्दर्शकावर ‘मी २’ चे आरोप करण्यात आले होते म्हणून अभिनेत्रीने नकार दिला होता.

“मी हेरॉईन….” रणबीर कपूरने सांगितला वाईट काळातील ‘तो’ अनुभव; सिगारेटच्या व्यसनाबद्दलही केला खुलासा

दीपिका नुकतीच ‘पठाण’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. जगभरातून या चित्रपटाने १००० कोटींच्यावर पैसे कमावले. या चित्रपटात दीपिकाच्या बिकीवरून वाद निर्माण झाला होता मात्र तरीदेखील चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या चित्रपटात दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसून आला. शाहरुखने तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.