अभिनेत्री जिनिलीया देशमुख अलीकडेच तिच्या ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटामुळे चर्चेत होती. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून जिनिलीया तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करते. रितेश आणि जिनिलीयाच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने अभिनेत्रीच्या रिल्स व्हिडीओला युजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. सध्या जिनिलीयाचा असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “बोबडी वळणे, जीभ जड होणे अन् शब्द…”, दिग्दर्शक विजू माने आणि गुलजार यांच्या पहिल्या भेटीचा न ऐकलेला किस्सा

जिनिलीया देशमुखने इन्स्टाग्राम रिल्सवर तिचा जुना मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या रिल्सच्या मजेशीर ऑडिओवर जिनिलीयाने मराठमोळ्या अंदाजात अभिनय केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने “अरे तुझा डिपी गेलाय का? तुझ्या घरात चार दिवस लाईट नाय ते पाह ना…अरे कावळे जेवढे काव काव करीत नाय, तेवढे पोरं पोरीच्या कमेंटवर वाव वाव करत्यात…” या व्हायरल डायलॉगवर अभिनय केला आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लवकरच घेणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पहिला लूक आला समोर

जिनिलीयाने हा व्हिडीओ शेअर करत, “माझा जुना व्हिडीओ…या मजेशीर व्हिडीओवर खळखळून हसून, तुम्ही सुद्धा वीकेंडला आनंदी राहा” असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह तिच्या जवळच्या मित्रमंडळींनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “लक्ष्मीच्या पावलांनी हे पदरात…”, ‘बाईपण भारी देवा’ला ५० दिवस पूर्ण, केदार शिंदेंनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश आणि जिनिलीया महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “कडक वहिनीसाहेब”, “लय भारी वहिनी!”, “वहिनी लई भारी अ‍ॅक्टिंग” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अन्य काही युजर्सनी यावर हसण्याचे इमोजी कमेंट केले आहेत.