Bollywood Actress was pregnant before marriage: कल्की कोचलिनला ‘देव डी’, ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. विशेषत: ‘यह जवानी है दिवानी’ मालिकेतील तिची आदिती ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

अभिनयाबरोबरच कल्की तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत होती. बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर तिने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने अनुरागबरोबरच्या घटस्फोटानंतर कठीण काळाचा सामना करावा लागला. घटस्फोटानंतर त्याला दुसऱ्या महिलेबरोबर पाहणे हे वेदनादायी होते, असे वक्तव्य केले. त्याबरोबरच लग्न झालेले नसताना ती गरोदर होती, असा खुलासादेखील तिने केला.

“लोक अजूनही त्याच काळातील विचारांबरोबर…”

‘झूम’शी संवाद साधताना कल्की म्हणाली, “लग्न केलेले नसताना गरोदर असणे किंवा आई होणे ही गोष्ट सामान्य आहे; पण अनेक लोकांसाठी ही फार मोठी गोष्ट आहे. मी ज्यावेळी गरोदर होते, त्यावेळी मी लग्न केले नव्हते. त्यावर लोक मला असे म्हणत असत की, तू लग्न न करताही कशी गरोदर आहेस? १८ व्या शतकात अशा गोष्टी बोलल्या जात असत. लोक अजूनही त्याच काळातील विचारांबरोबर कसे राहत आहेत, हे मला समजत नाही.

२०२० मध्ये कल्की कोचलिनला मुलगी झाली. कल्की त्यावेळी अविवाहित होती. पण इस्रायली संगीतकार गाय हर्शबर्गबरोबर ती दीर्घकाळापासून नात्यात होती. मुलीच्या जन्मानंतर काही काळाने त्यांनी लग्न केल्याचे जाहीर केले होते.

पुढे कल्की म्हणाली, “मी त्यावेळी माझ्या जोडीदाराबरोबर राहत होते. अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र होतो. आम्हाला मूल झाले, ही सामान्य गोष्ट आहे. आम्ही एकत्र राहत होतो, त्यामुळे मी गरोदर असणे, साहजिक होते. आपण अशा सोसायटीत राहतो, ज्यामध्ये असे दाखवले जाते की, अशा गोष्टी होऊ नयेत. मला वाटते की, आपण कधी कधी समाजात खोट्या गोष्टी जगत असतो, जिथे आपण असे भासवतो की, या गोष्टी घडत नाहीत. आपली लोकसंख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या गोष्टी घडतात.

लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव होता का? यावर कल्की म्हणाली, “जेव्हा तुम्ही लहान असता, त्यावेळी कुटुंबाकडून तो दबाव जाणवतो. पण, माझ्यावर कधी लग्न करण्यासाठी फार दबाव होता, असे जाणवले नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.