Actress Karishma Sharma jumps off from Mumbai Local : मुंबईत लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडणे, धावत्या ट्रेनमधून उतरताना दुखापत होणे अशा घटना घडत असतात. आता एका अभिनेत्रीने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आहे. तिने स्वतः पोस्ट करून याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली. करिश्मा शर्मा असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

करिश्मा शर्माने धावत्या लोकलमधून उडी घेतली. तिला चर्चगेटला शूटसाठी जायचं होतं, त्यासाठी ती साडी नेसून लोकलमध्ये चढली होती. स्टेशनवरून लोकल सुटली, तिने वेग पकडला आणि नंतर करिश्मा शर्माने लोकलमधून उडी मारली. यामुळे तिला जबर दुखापत झाली आहे.

करिश्मा शर्माने पोस्टमध्ये लिहिलं, “काल मी चर्चगेटला शूटसाठी जात होते, मी साडी नेसून लोकलने जायचं ठरवलं. मी ट्रेनमध्ये चढले, ट्रेन सुटली आणि वेग पकडला. मग मला लक्षात आलं की माझे मित्र ट्रेन पकडू शकले नाहीत. त्यामुळे मी घाबरून ट्रेनमधून उडी मारली. दुर्दैवाने पाठीवर पडले आणि डोक्याला जबर मार बसला.


माझ्या पाठीला दुखापत झाली आहे, डोकं सुजलं आहे आणि शरीरावर काही ठिकाणी खरचटलंय. डॉक्टरांनी एमआरआय केलं आणि डोक्याला झालेली दुखापत गंभीर आहे की नाही हे पाहण्यासाठी मला एक दिवस निरीक्षणाखाली ठेवलं आहे.
कालपासून मला खूप त्रास होतोय, पण मी हिंमत ठेवतेय. मी लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा.”

पाहा पोस्ट

actress karishma sharma jumps from local train
करिश्मा शर्माची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

करिश्मा शूटिंगसाठी जात होती, तिच्याबरोबर तिचे मित्र येणार होते पण ते लोकल पकडू शकले नाही त्यामुळे हिने उडी मारली. यामुळे करिश्मा जखमी झाली आहे.

करिश्मा शर्माच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील तिचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये करिश्माचे डोळे बंद दिसत आहेत. ‘हे घडलंय यावर विश्वास बसत नाही. माझी मैत्रीण ट्रेनमधून पडली आणि तिला काहीच आठवत नाही. आम्ही तिला खाली पडलेलं पाहिले आणि लगेच इथे आणलं. डॉक्टर सध्या तिची तपासणी करत आहेत,’ असं करिश्माच्या मैत्रिणीने लिहिलंय.

karishma sharma local train
करिश्मा शर्माच्या मैत्रिणीची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

करिश्मा शर्मा ‘प्यार का पंचनामा 2’, ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ व ‘उजड़ा चमन’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते.