आपल्या आवडत्या सिनेस्टार्सचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सोशल मीडियावर असे फोटो-व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. आता अशाच एका बॉलीवूड अभिनेत्रीचा बालपणीचा गोड व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ठरलं! हृतिक रोशनचा बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, अभिनेत्याने शेअर केली पहिली झलक

व्हिडीओमधील चिमुकलीने वैमानिकाची वेशभूषा केली आहे. ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडे आहे. हा गोड व्हिडीओ पाहून तिचे मित्र-मैत्रिणी आणि चित्रपटसृष्टीतील तिचे सहकलाकार अनन्याचे कौतुक करीत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने ‘क्यूट’, तर अनन्याची आई भावना पांडे यांनी, ‘तुझ्यावर खूप प्रेम आहे’ अशा कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : “माय हँडसम…”, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त मलायका अरोराने शेअर केलेली रोमॅंटिक पोस्ट चर्चेत

अनन्या या फोटोला कॅप्शन देत लिहिते “तुम्हाला हा व्हिडीओ पाहून विमानाने कुठेतरी सुट्टीवर जायची इच्छा झाली असेल.” या व्हिडीओमध्ये अनन्याचे वडील तिला “तू काय बनली आहेस? पायलट की, एअरहोस्टेस?”, “कोणत्या कंपनीकडून तू काम करतेस?” असे प्रश्न तिला विचारताना दिसत आहेत. बालपणी अनन्याला वैमानिक होण्याची इच्छा होती, परंतु आता अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कोकणात जाऊन घडवतेय मडकी, ‘तो’ फोटो शेअर करीत म्हणाली “कळलंय आयुष्य मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच अभिनेत्री अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अनन्याच्या ‘लायगर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नव्हती.