Preity Zinta Ex Boyfriend : बॉलीवूडमध्ये एखाद्या सेलिब्रिटी जोडप्याचं ब्रेकअप झाल्यावर त्यापैकी एखाद्याने इंडस्ट्रीतील इतर व्यक्तीला डेट करणं ही नवीन गोष्ट नाही. एका बॉलीवूड अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं की तिच्या पतीने प्रीती झिंटाला डेट केलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे सुचित्रा पिल्लई होय. तिने ‘दिल चाहता है’ मध्ये सैफ अली खानच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुचित्राला एकेकाळी ‘बॉयफ्रेंड पळवणारी’ असं म्हटलं गेलं होतं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने खुलासा केलेला की तिचा पती लार्स केएल्डसनने एकेकाळी बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट केलं होतं. पण त्यांच्या ब्रेकअपचं कारण आपण नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. प्रीती व लार्सचं ब्रेकअप झाल्यावर सुचित्रा लार्स एकत्र आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी ‘सुचित्राला बॉयफ्रेंड पळवणारी’ म्हटलं होतं.

आम्ही मैत्रिणी नव्हतो – सुचित्रा पिल्लई

टीकेबद्दल सुचित्रा म्हणाली, “प्रीती आणि मी कधीच मैत्रिणी नव्हतो, आमची कॉमन फ्रेंड असल्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखायचो. पण, होय, लार्सने प्रीती झिंटाला काही काळ डेट केलं होतं. पण मला भेटण्यापूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मी त्या दोघांच्या मध्ये आले नव्हते. त्यांनी वेगळ्या कारणासाठी ब्रेकअप केलं होतं.”

सुचित्राला फक्त प्रीती व लार्समुळेच बॉयफ्रेंड पळवणारी म्हटलं गेलं नाही तर आणखी एका नात्यामुळे म्हटलं गेलं होतं. सुचित्रा म्हणाली, “ती बातमी खरं तर गैरसमज होती, त्यांचं ब्रेकअप माझ्यामुळे झालं नव्हतं. मी इंग्लंडहून परत आले होते त्यावेळेस हे घडलं. काही मॅगझिनच्या पहिल्या पानावर बातम्या छापून आल्या आणि मला ‘बॉयफ्रेंड पळवणारी’ म्हटलं गेलं. ‘सुचित्रा पिल्लई ‘बॉयफ्रेंड पळवणारी’ आहे,’ असा त्यांचा मथळा होता.”

सुचित्रा पिल्लई व लार्स केएल्डसन लग्नाचा फोटो (सौजन्य – सोशल मीडिया)

“एकेकाळी जेव्हा मी अँड्र्यू कोयनला डेट करायला सुरुवात केली होती, तेव्हा त्याने भारतात स्टार टेलिव्हिजन सुरू केले होते. त्यावेळी माझ्यामुळे अँड्र्यू आणि त्याची पार्टनर मॉडेल अचला सचदेव वेगळे झाले असंही म्हटलं गेलं. पण तसं नव्हतं. खरं तर आता बरीच वर्षे झाली आहेत आणि त्या गोष्टी आठवून बऱ्याचदा मी आणि अचला हसत असतो,” असं सुचित्रा म्हणाली.

सुचित्रा पिल्लईने काही काळ डेट केल्यावर २००५ मध्ये लार्स केएल्डसनशी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली असून त्यांना अनिका नावाची एक मुलगी आहे. दुसरीकडे, प्रीती झिंटाने ९ वर्षांपूर्वी फायनान्स अॅनालिस्ट जीन गुडइनफशी लग्न केलं. हे दोघे २०२२ मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या बाळांचे आई-बाबा झाले. त्यांच्या मुलीचं नाव जिया तर मुलाचं नाव जय आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress suchitra pillai accepts her husband dated preity zinta says people called her boyfriend snatcher hrc