Tara Sutaria Veer Pahariya Dating Rumors: अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या स्टायलिश लूक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तारा जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तारा त्याच्याबरोबर एका रेस्टॉरंटबाहेर दिसली होती, त्यानंतर दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये एकत्र वॉक केला होता.

तारा सुतारियाचं नाव ज्याच्याबरोबर जोडलं जातंय, तो अभिनेता म्हणजे वीर पहारिया होय. ताराचा एक्स बॉयफ्रेंड आदर जैनचं लग्न झाल्यानंतर तारा व वीर डेट करू लागले, असं म्हटलं जात आहे. तारा व वीर यांच्या डेटिंगला जवळपास दोन महिने झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दोघांनी काही महिन्यांपूर्वी डेट करायला सुरुवात केली होती, दोघेही एकमेकांबरोबर वेळ घालवून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डेटवर जात आहेत.’

दरम्यान, वीर पहारियाच्या आधी ताराने अभिनेता व रणबीर कपूर, करीना कपूरच्या आत्याचा मुलगा आदर जैनला डेट केलं होतं. दोघेही जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तारा कपूर कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आदरबरोबर दिसायची. पण दोघांचं २०२३ मध्ये ब्रेकअप झालं. त्यानंतर आदरने त्याची व ताराची चांगली मैत्रीण असलेल्या अलेखा अडवाणीशी लग्न केलं.

कोण आहे वीर पहारिया?

वीर पहारियाने नुकतंच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलंय. ‘स्काय फोर्स’ हा त्याचा पहिला चित्रपट आहे. वीर हा जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे. तसेच तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. वीरच्या आईचं नाव स्मृती शिंदे व वडिलांचं नाव संजय पहारिया आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीर पहारियाचं बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलंय नाव

वीर पहारियाचं नाव आतापर्यंत काही बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे, त्यामध्ये सैफ अली खानची लेक सारा अली खानच्या नावाचा समावेश आहे. तसेच तो व मानुषी छिल्लर डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही काही वेळा एकत्र दिसले होते, मात्र त्यांचं ब्रेकअप झालं आणि आता तो ताराला डेट करतोय असं म्हटलं जात आहे.