बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही सतत काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असते. ‘उरी’सारख्या चित्रपटातून तिने एक कणखर ऑफिसरची भूमिका साकारली तर ‘अ थर्सडे’सारख्या चित्रपटातून एका मनोरुग्णाची भूमिकाही तिने उत्तम साकारली. यामी सोशल मिडियावर कायम चर्चेत असते. याबरोबरच ती तीचं परखड मतंदेखील सोशल मीडियावर मांडत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच ‘आस्क मी एनिथिंग’ असं ट्वीट करत यामीने सोशल मिडियावरून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि शक्य होईल तितक्या लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा तिने प्रयत्न केला. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला हरतऱ्हेचे प्रश्न विचारले. याबरोबरच बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दलही तिला एका चाहत्याने विचारलं. त्यावर यामीने आता परिस्थिती बदलत असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा : ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ ही वेबसीरिज फक्त सेक्सवरच भाष्य करते? अभिनेत्री प्रत्युत्तर देत म्हणाल्या….

एका चाहत्याने तिला विचारलं की, “बॉलिवूडमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना नेपोटीजमचा फटका बसतो, असं तुला कधी जाणवलं आहे का?” यावर यामीने त्याला उत्तर देत ट्वीट केलं. ती म्हणाली, “जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. आपण आता आपल्या वर्तमानावर लक्षकेंद्रित करायला हवं. उत्तम चित्रपट, कलाकार मग ते कोणत्याही कौटुंबिक पार्श्वभूमीचे असोत ते सादर करता येतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि तसा बदल सध्या चित्रपटसृष्टीत घडताना मला दिसतोय.”

‘अ थर्सडे’मधल्या भूमिकेनंतर यामी गौतम अभिषेक बच्चनबरोबर ‘दसवी’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने साकारलेल्या शिस्तप्रिय जेलरच्या भूमिकेची लोकांना प्रशंसा केली. आता यामी ‘लॉस्ट’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. शिवाय ती अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटातही आपल्याला दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress yami gautam respond to twitter user about bollywood nepotism avn
First published on: 20-10-2022 at 12:29 IST