बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. या दोघांनाही पार्टी, सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आता कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बॉलीवूडमधील सिद्धार्थ-कियारा ही लोकप्रिय जोडी लग्नासाठी योग्य ठिकाणाच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियारा गेल्या एका महिन्यापासून लग्नासाठी ठिकाण शोधत आहेत. चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास स्पा अण्ड रिसॉर्ट या आलिशान हॉटेलला संपर्क केला आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने पत्नी पत्रलेखासह याच हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली होती.

हेही वाचा >> “…म्हणून स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका”, अक्षय कुमारने सांगितलं राज ठाकरे कनेक्शन

सिद्धार्थ-कियारा चंदीगड आधी गोव्यात त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे प्लॅनिंग करत होते. परंतु, सिद्धार्थ मल्होत्राचा मोठं पंजाबी कुटुंब पाहता ते आता चंदीगडमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकी कौशल-कतरिना कैफप्रमाणे सिद्धार्थ-कियाराही त्यांच्या लग्नाची चर्चा आणि तयारी गुपितपणे करू इच्छित आहेत. लग्नानंतरच्या रिसेप्शनसाठी मुंबईमध्ये तयारी सुरू करण्यात आल्याचं पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार कळत आहे.

हेही वाचा >> अमेरिकन पॉर्नस्टारने शाहरुख खानला दिल्या खास शुभेच्छा, ‘पठाण’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेरशाह या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ-कियाराने पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. त्यानंतरच त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगू लागल्या होत्या. आता ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.