‘द काश्मीर फाईल्स’सारखा चित्रपट देणारे विवेक अग्निहोत्री गेले काही दिवस चांगलेच चर्चेत आहेत. बॉलिवूडचा दुटप्पीपणा आणि एकंदरच तिथे चालणारी स्टार सिस्टम यावर ते सातत्याने भाष्य करत असतात. बॉलिवूडमध्ये कसा कारभार चालतो, त्यांच्यातील कंपूशाही यावर ते सतत टीका टिप्पणी करत असतात.

नुकतंच त्यांनी आमीर खान आणि कियारा आडवाणी यांच्या एका जाहिरातीवर भाष्य केलं होतं. या जाहिरातीमध्ये हिंदू परंपरेविषयी काही गोष्टी त्यांना खटकल्या होत्या. नंतर या जाहिरातीला चांगलाच विरोध झाला. त्यामुळे एयू बँकेला ती जाहिरात मागे घ्यावी लागली होती. या जाहिरातीविरोधातही विवेक यांनी ट्वीट केलं होतं आणि त्यांच्या ट्वीटवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया देऊन आमीरवर टीका केली होती.

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला बांगलादेशात कार्यक्रमास बंदी, कारण…

आता विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटसृष्टीतील पुरस्कार सोहळे यावर टीका करणारं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेता रणवीर सिंग याच्यावर टीका केली असल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. विवेक यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “बॉलिवूडमधील पुरस्कार माफियाची कार्यपद्धती बघून मी हैराण झालो आहे. यावर्षी एका ‘कलरफुल स्टार’ला कित्येक पुरस्कार मिळाले, पण त्याचे बहुतेक सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आहेत. यावरुन ही यंत्रणा किती भ्रष्ट आहे याचा अंदाज येतो, बॉलिवूड मात्र याबद्दल आवाक्षरही काढणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक यांच्या ट्वीटला खूप लोकांनी प्रतिसाद दिला. विवेक यांनी यामध्ये कोणत्याही अभिनेत्याचं नाव जरी घेतलं नसलं तरी नेटकऱ्यांनी त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे आहे हे अचूक ओळखलं आहे. विवेक यांच्या या ट्वीटवरुन ते रणवीर सिंगला टोला लगावत आहेत असं म्हणत काही लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर हा त्याच्या अतरंगी फॅशनसाठी कायम चर्चेत असतो आणि त्यामुळेच विवेक अग्निहोत्री यांनी रणवीरसाठी ‘कलरफुल’ शब्द वापरला असल्याचं लोकांनी ओळखलं आहे. विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटाच्या संशोधनात व्यस्त आहेत.