अनुराग कश्यप हा बॉलीवूडमधील एक प्रथितयश दिग्दर्शक आहे. त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही चांगलाच मोठा आहे. अनुरागच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही तुफानच असतो. अनुरागने चित्रपटसृष्टीला एक वेगळं वळण दिलं, याबरोबरच त्यानं कित्येक नवोदित कलाकारांनाही संधी दिली आहे. अभिनेते, तंत्रज्ञ तसेच इतर बऱ्याच लोकांचं करिअर रुळावर आणण्यात अनुरागचा सिंहाचा वाटा आहे.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कित्येक मोठे बॉलिवूड स्टार्स आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचं अनुरागने सांगितलं, परंतु ते सगळे कलाकार हे त्याच्या जुन्या धाटणीच्या चित्रपटांप्रमाणेच अपेक्षा ठेवून असल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

आणखी वाचा : अनन्याबरोबर ब्रेक-अपनंतर ईशान खट्टरला मिळाली त्याची ‘ड्रीम गर्ल’; जाणून घ्या कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

‘फिल्म कंपेनीयन’शी संवाद साधतांना अनुराग कश्यप म्हणाला, “बहुतेक सगळेच लोक माझ्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत. पण त्यांना ‘देव डी’. ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारखेच चित्रपट करायचे आहेत. त्यांना माझ्याबरोबर नवीन गोष्ट करण्यात अजिबात रस नाही. मी जे काम केलं आहे तेच पुन्हा करण्यात मला करायची इच्छा नाही. कित्येक स्टार माझ्याकडे येतात अन् म्हणतात की तुमच्याबरोबर आणखी एक ‘देव डी’ करायची इच्छा आहे. त्यांना माझ्याबरोबर काय करायचं आहे हे त्यांना ठाऊक आहे, पण मला काहीतरी नवीन करायचं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मुलाखतीदरम्यान अनुरागने कित्येक विकी कौशल, नवाजुद्दीनसारख्या कलाकारांबरोबर आता काम करणं शक्य नाही असं वक्तव्य केलं होतं. सध्या अनुराग त्याच्या ‘केनडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रतिष्ठित अशा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अनुरागचा हा चित्रपट दाखवला गेला. या चित्रपटात राहुल भट्ट आणि सनी लिओनी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.