बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहे. तो त्याच्या ‘डंकी’, ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट घेऊन येत प्रेक्षकांचं २०२३ हे वर्ष मनोरंजक करणार आहे. शाहरुख खानच्या प्रत्येक चित्रपटांबाबत वेळोवेळी अनेक अपडेट्स समोर येत असतात. अलीकडेच शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या ओटीटी आणि सॅटेलाइट हक्कांबाबत बातम्या आल्या होत्या. यानंतर आता शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

आणखी वाचा : जान्हवी कपूर दिसणार वेगळ्या भूमिकेत, सत्य घटनेवर आधारित ‘मिली’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

शाहरुख खान ‘डंकी’ या चित्रपटात अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आता शाहरुख खानसोबत काही दिग्गज कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या शाहरुख खान त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण शाहरुख खानच्या या चित्रपटात काही नव्या स्टार्सची एन्ट्री झाली आहे. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात सतीश शाह आणि बोमन इराणी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटात बोमन इराणी एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर सतीश शाह एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार खूप वर्षांनी शाहरुख खानसोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहेत. शाहरुखने या दोघांबरोबर ‘मैं हूं ना’मध्ये एकत्र काम केलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अतिशय आनंद झाला आहे.

हेही वाचा : नातेसंबंध टिकून राहावे यासाठी बोमन इराणींनी दिला सल्ला, म्हणाले “आजचं भांडण उद्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तिघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी बरीच वर्ष वाट पाहिली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या तिघांना एकत्र पाहण्यासाठी अजून फक्त एका वर्षाची वाट पाहावी लागेल. शाहरुख खानचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख खान सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करताना दिसणार आहे.