चित्रपट निर्माते बोनी कपूर बऱ्याच वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या कुटुंबाला करावा लागलेला संघर्ष, डोक्यावरील कर्ज आणि झालेलं नुकसान याबाबत भाष्य केलं आहे. मुंबईला येण्यापूर्वी बोनी यांचे वडील सुरिंदर कपूर यांनी १० नोकऱ्या गमावल्या होत्या. कुटुंबाची परिस्थिती पाहता बोनी व अनिल कपूर यांनी वडिलांवरील भार कमी करण्यासाठी अभिनयक्षेत्रात यायचं ठरवलं, याबाबत सांगितलं.

‘गॅलेटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी म्हणाले, “माझ्या वडिलांना पृथ्वीराज कपूर यांनी मुंबईत आणलं होतं. माझ्या वडिलांनी १०-१२ नोकऱ्या सोडल्यामुळे आजोबांनी माझ्या वडिलांना पृथ्वीराज कपूर यांना सोपवलं. खरं तर कामावरून त्यांना हाकलूनच दिलं होतं, कारण ते कामगारांच्या बाजूने लढत होते, त्यांच्या हक्कांसाठी भांडत होते.” वडिलांचं लग्न झाल्यावर ते राज कपूर यांच्या घरात राहायचे. त्यांच्या नोकरांच्या खोलीत आपलं कुटुंब राहायचं असंही त्यांनी सांगितलं.

लिव्ह इनचा सल्ला देणाऱ्या झीनत अमानवर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “ती मजहर खानला लग्नाआधी…”

“माझ्या आजीचं निधन झाल्यावर अनिल आणि मी ठरवलं की तो अभिनय करणार आणि मी निर्मिती करणार. कारण कुणीतरी घर सांभाळायची गरज होती. माझ्या वडिलांना हृदयाशी संबंधित त्रास होता, त्यामुळे आम्हाला त्यांना ताण द्यायचा नव्हता,” असं बोनी कपूर म्हणाले. मी सहाय्यक म्हणून कामास सुरुवात केली होती, दुर्दैवाने माझ्या वडिलांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाचं निधन झालं. मग त्यांनी चित्रपट पूर्ण करण्यासाठी दुसरा दिग्दर्शक शोधला. आर्थिक संकट असूनही त्यांनी पुढील प्रकल्पासाठी दुसऱ्या दिग्दर्शकाला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. माझे वडील कर्जबाजारी होते, असं बोनी म्हणाले.

“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…

दरम्यान, बोनी कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची निर्मिती असलेला ‘मैदान’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण व प्रियामणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाने एका आठवड्यात ३१.८६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.