आपण एखादा चित्रपट बघतो तेव्हा त्यातील बऱ्याच बारीक सारिक गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, कॉस्च्युम याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कास्टिंग. कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे हे निश्चित करणं यालाच कास्टिंग असं म्हणतात. हे काम करणाऱ्याला कास्टिंग डायरेक्टर म्हटलं जातं, आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच एका मोठ्या कास्टिंग डायरेक्टरचं नाव म्हणजे मुकेश छाबरा.

आज मुकेश यांच्या नावाला इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचं वजन आहे. लहानातल्या लहान कलाकारापासून महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत कित्येकांचं कास्टिंग मुकेश करतात. नुकतंच मुकेश छाबरा यांनी यूट्यूबवरील ‘द रणवीर शो’ या चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कास्टिंग क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव शेअर केले. तसंच त्यांनी या मुलाखतीमध्ये सलमान खानबद्दल बऱ्याच नव्या गोष्टींचा उलगडा केला आहे.

आणखी वाचा : सेलेना गोमेझने रचला इतिहास; ४०० मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार करणारी ठरली पहिली महिला

या मुलाखतीमध्ये सलमान खानची खूप साधी जीवनशैली आहे, त्यांच्यावर परमेश्वराचा हात आहे असा खुलासा मुकेश यांनी केला आहे. मुकेश म्हणतात, “सलमान खान खूप साध्या घरात राहतात, गॅलक्सि अपार्टमेंटमध्ये फक्त १ बीएचके फ्लॅटमध्ये ते राहतात. या देशाचा सर्वात मोठा सुपरस्टार सलमान खानच्या घरात फक्त १ सोफा, १ डायनिंग टेबल, छोटंसं जीम आहे. चैनीच्या वस्तूंची त्यांना आवड नाहीये. एका सामान्य माणसासारखं ते आयुष्य जगतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानमध्ये आजवर कोणताही बदल झालेला नसून तो आज आहे तसाच आहे असं मुकेश छाबरा यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. मुकेश छाबरा यांनी सलमान खानबरोबर ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’, ‘कीक’ अशा वेगवेगळ्या चित्रपटासाठी काम केलं आहे. गेली १३ वर्षं ते सलमान खानसाठी काम करत आहेत. सलमानच्या आगामी काही प्रोजेक्टवरही मुकेश छाबरा काम करत आहेत.